झाेपेत असलेल्या वृद्धाचा डाेक्यात दगड घालून खून, संशयीत आराेपी ताब्यात
By राजकुमार जोंधळे | Updated: March 12, 2023 17:08 IST2023-03-12T16:56:49+5:302023-03-12T17:08:11+5:30
याप्रकरणी एका संशयीत तरुणाला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.

झाेपेत असलेल्या वृद्धाचा डाेक्यात दगड घालून खून, संशयीत आराेपी ताब्यात
लातूर : शहरातील गांधी मार्केट परिसरात झाेपत असलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाच्या डाेक्यात रविवारी पहाटेच्या सुमारास दगड घालून खून केल्याची घटना घडली. यातील मृत वृद्धाची अद्यापही ओळख पटलेली नाही. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्ह्याची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याप्रकरणी एका संशयीत तरुणाला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पाेलिसांनी सांगितले, भंगार गाेळा करुन आपला उरर्निवाह भागविणाऱ्या एक वृद्ध लातुरातील बसस्थानक परिसरात असलेल्या गांधी मार्केट येथील काॅम्पलेक्समध्ये झाेपी गेला हाेता. दरम्यान, प्रकाश नगर भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय युवकाने वृद्धाच्या डाेक्यात दगड घालता. यामध्ये वृद्धाचा मृत्यू झाला असून, ही घटना रविवारी पहाटे १ ते २ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी ही घटना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. याबाबातची माहिती गांधी चाैक पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांना मिळाली. त्यांनी सकाळी ७ वाजता घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. मृत वृद्धाची अद्यापही ओळख पटली नसून, ती पटविण्याचा प्रयत्न पाेलिस करत आहेत. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, संशीयीताला ताब्यात घेतले आहे.