चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून; विजेचा धक्का बसल्याचा बनाव करणाऱ्या पतीचे बिंग फुटले

By राजकुमार जोंधळे | Published: May 27, 2024 07:28 PM2024-05-27T19:28:04+5:302024-05-27T19:28:28+5:30

आरोपी पतीला चार दिवसांची काेठडी सुनाविण्यात आली आहे

Murder of wife on suspicion of character; The husband, who faked being electrocuted, burst into tears | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून; विजेचा धक्का बसल्याचा बनाव करणाऱ्या पतीचे बिंग फुटले

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून; विजेचा धक्का बसल्याचा बनाव करणाऱ्या पतीचे बिंग फुटले

देवणी (जि. लातूर) : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून खून केल्याची घटना कानेगाव (ता. शिरुर अनंतपाळ) येथे घडली. याबाबत देवणी पाेलिस ठाण्यात पतीविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पतीला अटक केल्याची माहिती पाेलिसांनी साेमवारी दिली. न्यायालयाने त्याला ३० मे पर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

पाेलिसांनी सांगितले, राजकुमार कृष्णा कुरे हा आपली पत्नी अनुसया (वय २७) हिला सतत चारित्र्याच्या संशयावरुन शाररिक आणि मानसिक छळ करत हाेता. दरम्यान, वेळप्रसंगी मारहाण करून जाच करत हाेता. पती राजकुमार याने शनिवार, २५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घरी पत्नीचे नाक-तोंड दाबले. शिवाय, भिंतीवर डोके आपटून गंभीर जखमी केले. काठीने जबर मारहाण केली. यामध्ये पत्नी अनुसया हिचा मृत्यू झाला. पत्नी मृतावस्थेत पडल्यानंतर पतीने ती वीजेच्या धक्क्याने मरण पावल्याची बनवाबनवी केली. काही वेळातच या प्रकरणाचे बिंग फुटले. 

मयत अनुसया हिचा भाऊ रवींद्र कैलास वग्गे (२९, रा. शिराढोण ता. निलंगा) यांनी देवणी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी राजकुमार कुरे याच्याविरोधात कलम ३०२, ४९८ (अ), ३२३, ५०४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी पतीला अटक केली आहे. त्याला देवणी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पाेलिस निरीक्षक माणिकराव डोके, पाेहेकाॅ. विनायक कांबळे, गणेश बुजारे, उस्तुर्गे करीत आहेत.

Web Title: Murder of wife on suspicion of character; The husband, who faked being electrocuted, burst into tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.