लातुरात दिवसाढवळ्या कत्तीने वार करून तरुणाचा खून / सुधारित बातमी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:24 AM2021-08-12T04:24:05+5:302021-08-12T04:24:05+5:30
पाेलिसांनी सांगितले, मयत गाेकुळ मंत्री हे आपल्या माेटारसायकल (एम.एच. २४ बी.ए. ४३३९) वरून मंगळवारी तीन वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. ...
पाेलिसांनी सांगितले, मयत गाेकुळ मंत्री हे आपल्या माेटारसायकल (एम.एच. २४ बी.ए. ४३३९) वरून मंगळवारी तीन वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. दरम्यान, दरम्यान, सद्गुरुनगरात आल्यानंतर एका मंदिराच्या पाठीमागील परिसरात भर रस्त्यात आराेपी आणि मयत गाेकुळ मंत्री यांच्यामध्ये मागील किरकाेळ भांडणाच्या कारणावरून बाचाबाची झाली. यातूनच गाेकुळ मंत्री यांच्या डाेक्यात, पाठीत, शरीरावर कत्ती, चाकू आणि धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामध्ये रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या गाेकुळ मंत्री यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी अप्पर पाेलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात मयताची पत्नी आकांक्षा गाेकुळ मंत्री २१ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाेघांविराेधात गुरनं. ३१५/ २०२१ कलम ३०२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आराेपीला पाेलिसांनी अटक केली आहे. तर दुसऱ्या फरार आराेपीच्या अटकेसाठी पाेलीस पथक मागावर आहेत. अधिक तपास पाेलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी करीत आहेत.
मागील भांडणावरून झाला खून...
मंगळवारी दिवसाढवळ्या दाेघांनी गाेकुळ मंत्री या तरुणाचा कत्ती आणि चाकूने सपासप वार करत खून केला. घटनेनंतर दाेघे मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. त्यांच्यापैकी एकाला अटक केली असून, दुसऱ्या आराेपीच्या मागावर पाेलीस पथक आहे. हा खून क्षुल्लक बाचाबाची, मागील किरकाेळ भांडणाच्या काणावरून झाला. दुसऱ्या आराेपीला अटक केल्यानंतर घटनेची वास्तवता समाेर येणार आहे, असे पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले.
दिवसाढवळ्या थरार...
लातूर शहरात क्षुल्लक कारणावरून एका ३५ वर्षीय तरुणाचा सपासप वार करून खून केल्याची थरारक घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पैशाच्या कारणावरून या मयत आणि आराेपीमध्ये वाद झाला असावा, अशीही माहिती आता समाेर येत आहे. मात्र, पत्नीने पाेलिसांना दिलेल्या माहितीनुसार मागील किरकाेळ कारणावरून ही घटना घडल्याचे म्हटले आहे.