वेअरहाउसमधील अडीच काेटींच्या शेतमालाची परस्पर विल्हेवाट; सहा व्यापाऱ्यांविराेधात गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: November 22, 2022 07:36 PM2022-11-22T19:36:25+5:302022-11-22T19:36:50+5:30
लातुरातील अतिरिक्त एमआयडीसी परिसरात असलेल्या काेल्ड स्टाेरेज गाेदाममध्ये एका व्यापाऱ्याने १ हजार बॅग उडीद आणि १ हजार ७०५ साेयाबीनचे कट्टे ठेवले हाेते.
लातूर : वेअर हाउसमध्ये उडीद आणि साेयाबीन कटट्यांची अप्रामाणीकपणे आणि अविश्वासाने परस्पर विल्हेवाट लावत तब्बल २ काेटी ४२ लाख २५ हजारांची फसवणूक केली. याबाबत तक्रारदाराने न्यायालया धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर लातुरातील सहा व्यापाऱ्यांविराेधात एमआयडीसी पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील अतिरिक्त एमआयडीसी परिसरात असलेल्या काेल्ड स्टाेरेज गाेदाममध्ये एका व्यापाऱ्याने १ हजार बॅग उडीद आणि १ हजार ७०५ साेयाबीनचे कट्टे ठेवले हाेते. दरम्यान, ४ नाेव्हेंबर २०१५ ते १७ नाेव्हेंबर २०२२ या काळात या शेतमालाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. या शेतमालाची मूळ किंमत तब्बल २ काेटी ५० लाख रुपये आणि बॅक दराने व्याज अशी एकूण रक्कम २ काेटी ४२ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली.
याबाबत लातूर येथील प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशान्वये, लातूर शहरातील सहा व्यापाऱ्याविराेधात एमआयडीसी पाेलीस ठाण्यात कलम ४२०, ४०३, ४०६, ४०९, १४७, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस उपनिरीक्षक संदीप कराड करत आहेत.