नागतीर्थवाडी ठरले मराठवाड्यातील शंभर टक्के लसीकरणाचे पहिले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:25 AM2021-09-04T04:25:19+5:302021-09-04T04:25:19+5:30

लातूर : देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी गावाने कोविड लसीकरणात आघाडी घेतली असून, गावात शंभर टक्के लसीकरण झाले आहे. मराठवाड्यातील शंभर ...

Nagtirthwadi became the first village in Marathwada to be 100% vaccinated | नागतीर्थवाडी ठरले मराठवाड्यातील शंभर टक्के लसीकरणाचे पहिले गाव

नागतीर्थवाडी ठरले मराठवाड्यातील शंभर टक्के लसीकरणाचे पहिले गाव

Next

लातूर : देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी गावाने कोविड लसीकरणात आघाडी घेतली असून, गावात शंभर टक्के लसीकरण झाले आहे. मराठवाड्यातील शंभर टक्के लसीकरण करणारे पहिले गाव नागतीर्थवाडी ठरले आहे.

अक्का फाऊंडेशनच्या पुढाकारातून नागतीर्थवाडीमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या गावाची लोकसंख्या ६७४ असून, १८ वर्षांपुढील सर्वांचेच लसीकरण पूर्ण झाले आहे. तरुणांसह वयोवृद्धांनी, तसेच दिव्यांगांचे लसीकरण झाले. लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याला गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला असून, गाव शंभर टक्के लसीकरणाबरोबरच कोरोनामुक्त झाले आहे.

निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या सूचनेनुसार अक्का फाऊंडेशनच्या माध्यमातून अरविंद पाटील-निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के लसीकरणाला यश मिळाले आहे. तहसीलदार सुरेश घोळवे, देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी गावात वेळोवेळी भेट देऊन नागरिकांना लस घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरमे, वैद्यकीय अधिकारी चैतन्य हत्ते यांनी मागणीनुसार लस उपलब्ध करून दिली. त्यामुळे शंभर टक्के लसीकरण झाले.

गावकऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे परिश्रम...

आरोग्य अधिकारी डॉ. अमोल नरहरे, आरोग्यसेविका शोभा सुरवसे, आर. व्ही. बिराजदार, जे. के. मळभागे, तसेच आशा कार्यकर्त्यांसह गावातील राज गुणाले, उपसरपंच विष्णुदास गुणाले, ग्रामसेवक श्रीकांत पताळे व ग्रामपंचायत सदस्यांनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले. दिव्यांग व वयोवृद्धांना घरी जाऊन लस दिली.

Web Title: Nagtirthwadi became the first village in Marathwada to be 100% vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.