नलिनी टेंबेकर यांची दयानंद महाविद्यालयात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:58 AM2020-12-04T04:58:19+5:302020-12-04T04:58:19+5:30
मराठा लिबरेशन टायगर संघटनेचे निवेदन लातूर : केंद्र सरकारच्या कृषी कायदा रद्द करावा, यासह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे शेतकर्यांचे ...
मराठा लिबरेशन टायगर संघटनेचे निवेदन
लातूर : केंद्र सरकारच्या कृषी कायदा रद्द करावा, यासह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे शेतकर्यांचे आंदोलन सुरु आहे. सदरील कृषी कायदे तात्काळ रद्द करावेत अशी मागणी मराठा लिबरेशन टायगर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर महेश गुंड, श्रीनिवास बंडूरे, किरण पवार, भिमराव गडेराव, रहीम शेख, अभिजीत गणापूरे, दत्ता पवार, नरेश गुणाले, खुदूस शेख, शाम माने आदींसह पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
मुंबई येथील आंदोलनात सहभागी हाेण्याचे आवाहन
लातूर : मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. हरीभाऊ राठोड मुंबई येथे ५ डिसेंबरपासून आंदाेलन करणार आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील समाजबाधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अंकुश जाधव, जगदीश राठोड, सुरेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, वाल्मीक चव्हाण, गुणवंत पवार, सरस्वती जाधव, सुमनश्री जाधव, मीरा राठोड, राहूल जाधव, के.के.राठोड आदींनी केले आहे.
खाजगी क्लासेस सुरु करण्याची मागणी
लातूर : १० आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खाजगी क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी युवा भिमसेना संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष अमेाल जाकते, सिद्धार्थ गवळी, बालाजी कांबळे, अजय म्हस्के, शेखर कांबळे, सोमनाथ गवळे आदींसह युवा भिमसेना संघटनेच्या पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
अंबाजाेगाई रोड येथे ग्राहक सेवा केंद्राची सुविधा
लातूर : शहरातील अंबाजोगाई रोड येथे भारतीय स्टेट बँकेच्या वतीने ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. यावेळी बँकेचे मुख्य प्रबंधक अनंत कसबे, सुनिल पडीले, ॲड. बालाजी पडीले,केदार कोंडे, किशोर वहाणे, सुमुख गोविंदपुरकर, नामदेवराव पडीले, अजयकुमार यादव, श्रीकांत गर्जे, दिनेश ढोबळे आदींसह अधिकारी, कर्मचार्यांची उपस्थिती होती.