लातुरात १२ नोव्हेंबरला राष्ट्रीय लाेकअदालत; प्रलंबित खटल्यांसह अनेक प्रकरणे निकाली निघणार

By राजकुमार जोंधळे | Published: October 18, 2022 05:22 PM2022-10-18T17:22:01+5:302022-10-18T17:22:15+5:30

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने घेतला पुढाकार

National Lokadalat on November 12 in Latur district; Various cases will be settled! | लातुरात १२ नोव्हेंबरला राष्ट्रीय लाेकअदालत; प्रलंबित खटल्यांसह अनेक प्रकरणे निकाली निघणार

लातुरात १२ नोव्हेंबरला राष्ट्रीय लाेकअदालत; प्रलंबित खटल्यांसह अनेक प्रकरणे निकाली निघणार

googlenewsNext

लातूर : महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार येत्या १२ नाेव्हेंबर २०२२ राेजी लातूर मुख्यालयासह जिल्ह्यातील तालुका न्यायालयांत राष्ट्रीय लाेकअदालतीचे आयाेजन करण्यात आले आहे.

आयाेजित केलेल्या लाेकअदालतमध्ये अधिकाअधिक पक्षकारांनी सहभागी हाेऊन न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे तडजाेडीने निकाली काढली जावीत, असे अवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधि सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुरेखा काेसमकर, सचिव एस. डी. अवसेकर यांनी केले आहे. राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार आयाेजित राष्ट्रीय लाेकअदालतीमध्ये दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. लातूर जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयात घेण्यात येत असलेल्या या लाेकअदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फाैजदारी, १३८ एनआय ॲक्टची प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, माेटार वाहन प्रकरणे, काैटुंबिक वादाची प्रकरणे, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट समझोता प्रकरणे, भू-संपादन, कामगार, सहकार न्यायालय, वीज व पाणीबिल प्रकरणे, पगार व भत्ते प्रकरण आणि सेवानिवृत्तीबाबत प्रकरणे, महसूल प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, दूरध्वनी/ माेबाइल कंपन्यांची प्रकरणे, तसेच न्यायालयात येण्याअगाेदरचे दाखलपूर्व प्रकरणे अशा सर्व प्रकारच्या तडजाेडयाेग्य प्रकरणे तडजाेडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

पक्षकारांनी आपल्यातील प्रकरणे सुलानाम्यासाठी ठेवून सामंजस्याने ती साेडवावीत. तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे या लाेकअदालतीत ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात, न्यायालयातील जिल्हा विधि सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधि सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: National Lokadalat on November 12 in Latur district; Various cases will be settled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.