महागारईविराेधात राष्ट्रवादीचे लातुरात आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:35+5:302021-07-04T04:14:35+5:30

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदाेलन करण्यात आले. यावेळी ...

NCP's agitation in Latur against inflation | महागारईविराेधात राष्ट्रवादीचे लातुरात आंदाेलन

महागारईविराेधात राष्ट्रवादीचे लातुरात आंदाेलन

Next

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदाेलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच दगडाची चूल मांडून त्यावर स्वयंपाक करत गॅस दरवाढीचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विराेधात कार्यकर्ते माेठ्या संख्यने एकत्र येत निदर्शने केली. अनेक कार्यकर्त्यांच्या हातात महागाईच्या विराेधात घाेषणा असलेले फलक, गॅस सिलिंडची प्रतिमा असलेले फलक हाेते. पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीच्या विराेधात छत्रपती शिवाजी महाराज चाैकातच रस्त्यावर दगडाची चूल मांडून भाकरी थापत इंधनदरवाढीचा निषेध नाेंदविला. यावेळी केंद्र सरकारच्या विराेधात घाेषणाबाजी करण्यात आली. आंदाेलनात राष्ट्रवादीचे बबन भाेसले, मीनाक्षीताई शिंगाडे, विशाल विहिरे, गजानन खमीतकर, मदन काळे, समीर शेख, मधुताई शिंदे, पूजा गाेरे आदीसह कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

पाेलिसांनी घेतले कार्यकर्त्यांना ताब्यात...

सध्याला लातूर जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील दाेन दिवस वीकेंड लाॅकडाऊन पाळले जात आहे. त्यातच जिल्हाभरात काेराेनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. यासाठी शिवाजीनगर पाेलिसांनी आंदाेलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नंतर साेडून दिले. आंदाेलनस्थळी पाेलिसांचा बंदाेबस्त लावण्यात आला हाेता.

Web Title: NCP's agitation in Latur against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.