देवणी जातीच्या पशुधनांच्या संवर्धनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:21 AM2021-02-05T06:21:36+5:302021-02-05T06:21:36+5:30
चवणहिप्परगा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जलजीवन मिशनअंतर्गत लाेकसहभागातून घेण्यात आलेल्या नळ जाेडणीची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी ग्राम पंचायतीच्या कामाचे त्यांनी ...
चवणहिप्परगा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जलजीवन मिशनअंतर्गत लाेकसहभागातून घेण्यात आलेल्या नळ जाेडणीची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी ग्राम पंचायतीच्या कामाचे त्यांनी काैतुक केले. त्याचबराेबर देवणी जातीचे पशुधन प्रसिद्ध आहेत. त्यांचे संगाेपन, संवर्धन करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने याेग्य त्या उपाययाेजना करण्याबाबत शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सरपंच रामदास कांबळे, उपसरपंच नवाज शेख, चेरमन राम बिरादार, पोलीस पाटील प्रदीप पाटील, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रामलिंग शेरे, बाळासाहेब बिरादार, शाखा अभियंता एस.एस. पाटील, कानडे, ग्रामपंचायत सदस्य दयाराम शेंदकर, नरसिंग गणापुरे, राजेश बिरादार, विस्तार अधिकारी मस्के ग्रामसेवक श्रीकांत पताळे, मकैलवाडे, संतोष शिरापुरे, मजकुरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.