NEET Exam Paper Leak: एटीएसने जप्त केलेला माेबाइल इरण्णाच्या मुलीचा !

By राजकुमार जोंधळे | Published: July 20, 2024 07:47 PM2024-07-20T19:47:01+5:302024-07-20T19:47:53+5:30

एटीएसची दिशाभूल : चाैकशीत हाेतील खुलासे, सीबीआयला संशय

NEET Exam Paper Leak: Iranna's daughter's mobile phone seized by ATS! | NEET Exam Paper Leak: एटीएसने जप्त केलेला माेबाइल इरण्णाच्या मुलीचा !

NEET Exam Paper Leak: एटीएसने जप्त केलेला माेबाइल इरण्णाच्या मुलीचा !

लातूर : ‘नीट’ गुणवाढीचे आमिष दाखवून विद्यार्थी - पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी लातुरात चाैघांविराेधात गुन्हा दाखल असून, यातील तिघांना सीबीआयने अटक केली आहे, तर पसार इरण्णा काेनगलवार याने नांदेड येथील तपास पथकाचीच दिशाभूल केल्याचे समाेर आले. जप्त माेबाइल इरण्णाचा नसून ताे मुलीचा असल्याचे आढळून आले. या चाैकशीसाठी इरण्णाचा ताबा द्यावा, अशी विनंती सीबीआयने लातूर न्यायालयाकडे केली असून, न्यायालयाने शुक्रवारी अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल राखून ठेवला आहे.

नांदेड एटीएसने गुणवाढीच्या संशयावरून लातुरातील दाेघा शिक्षकांसह इरण्णाला प्राथमिक चाैकशीसाठी २२ जून राेजी ताब्यात घेतले हाेते. चाैकशीनंतर साेडून दिले. दरम्यान, पथकाने शिक्षक, इरण्णाचे माेबाइल जप्त केले हाेते. माेबाइल तपासणीत नीट परीक्षेची प्रवेशवपत्रे आढळून आली. गुणवाढीच्या अनुषंगाने काही संदर्भ एटीएसच्या हाती लागले. त्यानंतर २३ जून राेजी शिवाजीनगर ठाण्यात चाैघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. इरण्णाने एटीएसकडे दिलेला माेबाइल हा स्वत:चा नसून मुलीचा असल्याचे तपासात समाेर आले. त्याने तपास यंत्रणांचीच दिशाभूल केली असून, चाैकशीत अनेक धागेदाेरे हाती लागतील. शिक्षकाच्या माेबाइलमध्ये पालकांची नावे आढळली. त्याच्याही माेबाइलमध्ये ती आढळतील. यातून झालेले व्यवहार व इतर अनेक खुलासे हाेतील, असा संशय सीबीआयला आहे. दरम्यान, गंगाधरच्या काेठडीत शुक्रवारी १४ दिवसांची वाढ करण्यात आली.

लातूर न्यायालयातील घडामाेडी

सीबीआय वकिलाचा युक्तिवाद
१) नीट गुणवाढीच्या गुन्ह्यात लातुरातील चाैघा आराेपींचा सहभाग असल्याचे समाेर आले. सीबीआयने तिघांची चाैकशी केली आहे.
२) या चाैकशीत इरण्णा काेनगलवार याचा सहभाग असल्याचे दाेघा शिक्षकाच्या जबाबामध्ये नाेंदविण्यात आले आहे.
३) त्याचा माेबाइल जप्त करायचा असून, माेबाइलमध्ये अनेक धागेदाेरे हाती लागतील. यासाठी चाैकशी करायची आहे.
४) हे प्रकरण देशव्यापी असून, एफआयआरमध्ये नाेंदवलेल्या चाैथ्या आराेपींचा ताबा महत्त्वाचा आहे, असा युक्तिवाद लातूर न्यायालयात सीबीआयचे वकील मंगेश महिंद्रकर यांनी केला.

आराेपीच्या वकिलाचा युक्तिवाद
१) गंगाधरनेच इरण्णाशी संपर्क केला. त्यालाही मुलीचे गुण वाढवून देताे, एमबीबीएसला प्रवेश मिळवून देताे, असे आमिष दाखविले.
२) इरण्णा आमिषाला बळी पडला नाही. तसे असते तर मुलीला नीटमध्ये १६० गुण मिळाले नसते. यात त्यास फसविण्याचा प्रयत्न झाला आहे.
३) जाधव, पठाण व गंगाधरच्या संपर्कात इरण्णा हाेता, हे खरे आहे. मात्र, जेव्हा लक्षात आले, हे लाेक गैरप्रकार करत आहेत. त्यावेळी ताे लांब राहिला.
४) यात कुठलाही सहभाग नाही. २२ जून राेजी चाैकशीत सहकार्य केले. त्याला मधुमेह, रक्तदाब असून, अटकपूर्व जामीन द्यावा. गरज असेल तेव्हा सीबीआयला तपासात मदत केली जाईल, अशी बाजू वकील ए. पी. ताेतला यांनी मांडली.

Web Title: NEET Exam Paper Leak: Iranna's daughter's mobile phone seized by ATS!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.