अंबाजोगाईत माेबाईलवर केला कॉल; 'त्या' एजंटाचा लातूर पोलिसाकडून शोध
By राजकुमार जोंधळे | Published: June 29, 2024 05:18 AM2024-06-29T05:18:44+5:302024-06-29T05:19:00+5:30
सध्या नीट प्रकरणाची देशभर चर्चा सुरु झाल्यानंतर तीने आपल्या वडिलांना हा प्रकार सांगितला.
लातूर : नीट परीक्षेत ६५० पेक्षा जास्त गुण मिळवून देऊ म्हणून अंबाजाेगाईतील एका विद्यार्थीनीच्या माेबाईलवर केलेल्या काॅल्सची तपास यंत्रणा पडताळणी करणार आहे. या माध्यमातून काॅल करणारा ताे एजंट काेण आहे? याचाही शाेध घेतला जाणार आहे.
अंबाजाेगाई येथील विद्यार्थीनी हैदराबाद येथे शिक्षणासाठी आहे. तीने यंदी नीट परीक्षा दिली असून, या काळात तिच्या माेबाईलवर एका दलालाचा फाेन आला हाेता. तुला आम्ही नीट परीक्षेत ६५० पेक्षा अधिक गुण मिळवून देऊ, तुझा चांगल्या मेडिकल काॅलेजमध्ये नंबर लागेल. अभ्यास करण्याची गरज नाही, आम्ही सर्व काही मॅनेज करु, यासाठी आम्हाला ८० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. सध्या नीट प्रकरणाची देशभर चर्चा सुरु झाल्यानंतर तीने आपल्या वडिलांना हा प्रकार सांगितला. हा काॅल काेठून आणि काेणत्या क्रमांकावरुन आला हाेता. याचा तपास पाेलिस करणार आहेत. हा काॅल नीट गुणवाढीसंदर्भात काम करणाऱ्या एजंटाचा हाेता की इतर काेणाचा हाेता, याचीही माहिती पाेलिस घेत आहेत.
लातुरात दाेन्ही आराेपींच्या चाैकशीत गुणवाढीसंदर्भातील एजंटाचे जाळे शेजारच्या जिल्ह्यात पसरले आहे का? याचाही शाेध घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या १४ जणांच्या चाैकशीत लातूर, बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची नावे समाेर आली आहेत.