नीट घोटाळा : ‘कोडवर्ड’मध्ये दडले काय? ६ हजार मेसेजचा सुगावा लागेना

By राजकुमार जोंधळे | Published: July 14, 2024 10:00 AM2024-07-14T10:00:37+5:302024-07-14T10:00:52+5:30

सीबीआयचा मुक्काम वाढणार, महाराष्ट्र-बिहार कनेक्शनचा शाेध

Neet scam CBI stay to be extended Maharashtra Bihar connection found | नीट घोटाळा : ‘कोडवर्ड’मध्ये दडले काय? ६ हजार मेसेजचा सुगावा लागेना

नीट घोटाळा : ‘कोडवर्ड’मध्ये दडले काय? ६ हजार मेसेजचा सुगावा लागेना

लातूर : ‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एंटरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा म्हाेरक्या गंगाधर सीबीआय काेठडीत असून, त्याच्या माेबाइलमधील सहा हजार मेसेजचा तिसऱ्या दिवशीही उलगडा झाला नाही; तर माेबाइलमधील ‘काेडवर्ड’मध्ये काेणाची नावे दडली आहेत? याचीही उकल हाेत नसल्याने गूढ वाढले आहे. गंगाधरची सीबीआय कसून चाैकशी करत असून, महाराष्ट्र-बिहार कनेक्शनचा शाेध घेत आहे.

आंध्र प्रदेशातील एन. गंगाधर आणि लातुरातील शिक्षक संजय जाधव, जलीलखाँ पठाण व पसार इरण्णा काेनगलवार यांची नावे समाेर आली. तिघांच्या चाैकशीत गुणवाढीचा संदर्भ अन् त्यातून पालकांकडून उकळलेल्या पैशाचे बिंग फुटले. आता हाच धागा पकडून उत्तर भारतातील ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या आराेपींचा नेमका संबंध काय? याचाही शाेध घेतला जात आहे.

‘साहब, गर्मी हाे रही है...’ गंगाधरची तगमग सुरू

बंगळुरू येथून गंगाधरला सीबीआयने ६ जुलै राेजी ताब्यात घेतले. नाॅनस्टाॅप प्रवासानंतर ८ जुलै राेजी त्याला लातुरात आणले. लातुरात आल्यापासूनच गंगाधरची प्रकृती साथ देईना. ‘साहब, मुझे बहाेत गर्मी हाे रही है, एसी...लगाव ना...’ असे सीबीआय अधिकाऱ्यांना ताे म्हणत आहे. सध्याला त्याची तगमग सुरू आहे. गंगाधर ‘नीट’मधील मास्टरमाइंड असून, त्याच्या माेबाइलमधील मेसेज, काेडवर्डमधील नावांची जुळवाजुळव करणे माेठे आव्हान आहे.  

गुणवाढीतूनच जुळले चाैघांचे कनेक्शन

संजय जाधव हा पुतण्याचे गुण वाढविण्यासाठी प्रयत्न करत हाेता. दरम्यान, इरण्णा काेनगलवार (मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) याने आंध्र प्रदेशातील एन. गंगाधरची ओळख करून दिली.

पुतण्याचे ‘नीट’मधील गुण वाढल्याचे समाेर आले असून, यातूनच हे ‘नीट कनेक्शन’ अधिक मजबूत झाले आहे. संजय जाधवच्या माध्यमातून गंगाधरने महाराष्ट्रात सबएजंट नेमले आणि पालकांकडून पैसे उकळले.

बिहारच्या ‘त्या’ आराेपींचा संबंध काय? 
 
 आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रात गंगाधरचे एजंट असल्याचे समाेर आले आहे. लातुरातील गुणवाढीचा ‘धागा’ सीबीआयच्या हाती लागला आहे. 

 आता हाच धागा पकडून बिहार राज्यात नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीप्रकरणात अटक केलेल्या त्या १३ आराेपींचा आणि आंध्र प्रदेशातील एन. गंगाधरचा नेमका संबंध काय? याचीही पडताळणी केली जाणार आहे.

पाच भाषांमध्ये संवाद

सीबीआय काेठडीत असलेल्या गंगाधरचे तेलुगू, तमीळ, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या भाषांवर प्रभुत्व आहे. त्याचे वास्तव्याला असलेले हिंदूपुरम् हे गाव बंगळुरूपासून १०० कि.मी. अंतरावर आहे. 

आंध्रप्रदेश-तामिळनाडू-कर्नाटक राज्यांच्या सीमेवर वसलेल्या हिंदूपुरममुळे त्याचा या राज्यांत वावर असल्याचे समाेर आले आहे. अलीकडे ताे महाराष्ट्रातही दाखल झाल्याचे तपासात उघड झाले आहे. याच बहुरूपाने त्याने अनेकांना गळाला लावले.

‘साहब, गर्मी हाे रही है...’ गंगाधरची तगमग सुरू

बंगळुरू येथून गंगाधरला सीबीआयने ६ जुलै राेजी ताब्यात घेतले. नाॅनस्टाॅप प्रवासानंतर ८ जुलै राेजी त्याला लातुरात आणले. लातुरात आल्यापासूनच गंगाधरची प्रकृती साथ देईना. ‘साहब, मुझे बहाेत गर्मी हाे रही है, एसी...लगाव ना...’ असे सीबीआय अधिकाऱ्यांना ताे म्हणत आहे. सध्याला त्याची तगमग सुरू आहे. गंगाधर ‘नीट’मधील मास्टरमाइंड असून, त्याच्या माेबाइलमधील मेसेज, काेडवर्डमधील नावांची जुळवाजुळव करणे माेठे आव्हान आहे.
 

Web Title: Neet scam CBI stay to be extended Maharashtra Bihar connection found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.