लातूर शहरात रात्री अपघात; ट्रक-कंटेनर-कारचे नुकसान, औसा राेडवर मंगळवारी रात्री १०:४५ वाजताची घटना

By राजकुमार जोंधळे | Published: June 11, 2024 11:42 PM2024-06-11T23:42:53+5:302024-06-11T23:43:40+5:30

शहातील आदर्श काॅलनी चाैकानजीक भरधाव ट्रक-कंटेनर आणि कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना मंगळवारी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

Night accident in Latur city Truck-container-car damage | लातूर शहरात रात्री अपघात; ट्रक-कंटेनर-कारचे नुकसान, औसा राेडवर मंगळवारी रात्री १०:४५ वाजताची घटना

लातूर शहरात रात्री अपघात; ट्रक-कंटेनर-कारचे नुकसान, औसा राेडवर मंगळवारी रात्री १०:४५ वाजताची घटना

राजकुमार जाेंधळे

लातूर : शहातील आदर्श काॅलनी चाैकानजीक भरधाव ट्रक-कंटेनर आणि कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना मंगळवारी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये ट्रक-कंटेनर आणि कारचे नुकसान झाले आहे असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर औसा राेडवरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली हाेती. 

लातूर शहरातील औसा राेडवर आदर्श काॅलनी ते राजीव गांधी चाैकादरम्यान मंगळवारी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास एक भरधाव ट्रक कंटेनरवर आदळला आणि कंटेनर कारवर आदळला. हा अपघात तीन वाहनांचा असल्याने रस्त्यावर वाहनधारकांची एकच गर्दी झाली हाेती. अपघात विचित्र असल्याने पळापळ सुरु झाली. औसा राेडवर हा अपघात झाल्याने एकच गाेंधळ उडाला. या अपघतात कारचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

अन् कंटेनरवर आदळला भरधाव ट्रक...

छत्रपती शिवाजी महाराज चाैक ते राजीव गांधी चाैकादरम्यान आदर्श काॅलनी परिसरात हा अपघात मंगळवारी रात्री झाला. पाठीमागून आलेला भरधाव ट्रक हा कंटेनरवर जाेराने आदळा आणि कंटेनर कारवर आदळला. यावेळी बघ्यांची माेठ्या प्रमाणावर एकच गर्दी झाली हाेती. यात तीनही वाहनांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Night accident in Latur city Truck-container-car damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.