पाणी विक्रेत्यांना नोटीसा, विनापरवाना प्लांट हाेणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:21 AM2021-02-05T06:21:31+5:302021-02-05T06:21:31+5:30
अहमदपूर तालुक्यात ५० जारचे पाणी पुरवठा करणारे प्लांट आहे. त्यातील ३५ शहरात तर १५ ग्रामीण भागात आहेत. सदरील प्लांट ...
अहमदपूर तालुक्यात ५० जारचे पाणी पुरवठा करणारे प्लांट आहे. त्यातील ३५ शहरात तर १५ ग्रामीण भागात आहेत. सदरील प्लांट हे २० लिटरच्या जारमध्ये शुद्ध पाणी विक्रीचा व्यवसाय करतात. सध्या एका बाॅटलला २० रुपये तर थंड पाण्यासाठी ३० रुपयांचा दर आकारला जात आहे. घरपोच सेवा असल्याने अनेक नागरिक शुद्ध पाणी असल्याचे समजून प्लांटचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत; मात्र याबाबत कुठलीही खात्री केली जात नसल्याचे समाेर आले आहे. यासंदर्भात हरित लवादाच्या आदेशान्वये संबंधित प्लांटचालकांचे पाणी टीडीएस १५० ते २०० असणे आवश्यक आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली फसवणूक हाेत असल्याचे समाेर आले आहे. अशा प्लांटवर आता संक्रांत आली आहे. बेकायदेशीर, नियमबाह्य प्लांट सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधिताना नाेटीसा बजावण्यात आल्या आहेत. असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे म्हणाले. नगरपालिकेकडून नियमांचे पालन करणाऱ्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे.