लातूरमध्ये ८१ उमेदवारांना बजावल्या नोटिसा
By Admin | Published: February 14, 2017 09:46 PM2017-02-14T21:46:54+5:302017-02-14T21:46:54+5:30
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराने दैनंदिन खर्च दुसऱ्या दिवशी
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 14 - राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराने दैनंदिन खर्च दुसऱ्या दिवशी सादर करणे बंधनकारक केले असतानाही तो सादर न करणाऱ्या तालुक्यातील ८१ उमेदवारांना निवडणूक विभागाने मंगळवारी नोटिसा बजावल्या आहेत़.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीतील उमेदवारांनी दैनंदिन खर्च तहसील कार्यालयात सादर करणे बंधनकारक केले आहे. नामनिर्देशनपत्र सादर केल्यापासून दैनंदिन खर्चाचा तपशील देणे गरजेचे आहे. प्रचारासाठी दिवसभर झालेल्या खर्चाचा तपशील दुसऱ्या दिवशी दुपारी २ वा़ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. लातूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १० गटांसाठी व पंचायत समितीच्या २० गणांसाठी ही निवडणूक होत असून, ११० उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी २९ उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा तपशील सादर केला आहे. उर्वरित ८१ उमेदवारांनी हा खर्च सादर केला नाही़. त्यामुळे मंगळवारी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने या ८१ उमेदवारांना नोटिसा बजावल्या आहेत. (प्रतिनिधी)
निकाल रोखता येतो़
प्रत्येक उमेदवाराने दैनंदिन खर्च सादर करणे आवश्यक आहे़ त्यामुळे हा खर्च सादर करावा म्हणून नोटीसवजा सूचना बजावण्यात आली आहे़ ज्यांनी हा खर्च सादर केला नाही, त्यांचा निकाल रोखला जाऊ शकतो, असे तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागातील अधिकाºयांनी सांगितले़