आता मिशन अॅडमिशन
By Admin | Published: June 14, 2014 01:17 AM2014-06-14T01:17:31+5:302014-06-14T01:20:23+5:30
लातूर : जून महिन्यातील पहिला आठवडा संपला आहे. सीबीएसई पॅटर्नच्या दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. बारावीचाही निकाल नुकताच लागला आहे.
लातूर : जून महिन्यातील पहिला आठवडा संपला आहे. सीबीएसई पॅटर्नच्या दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. बारावीचाही निकाल नुकताच लागला आहे. आता दहावी बोर्डाचा निकाल १७ जून रोजी जाहीर होणार आहे. उर्वरित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निकाल एक-दोन आठवड्यांत लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांची अकरावीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. निकालानंतर सर्वांचेच ध्येय ‘मिशन अॅडमिशन’चे आहे. त्यामुळे जिल्ह्यात ११ वीच्या नेमक्या जागा किती, अन्य अभ्यासक्रमाच्या संदर्भात किती आदी संदर्भातील आकडेवारी.
दहावी व बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश लातूर जिल्ह्यातील पोरांनी मिळविले. वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या प्रवेशपूर्व परीक्षेतही लातूरच्या विद्यार्थ्यांचा दबदबा वाढतच आहे. त्यामुळे पुण्या-मुंबईकडील विद्यार्थ्यांचा ओढा लातूर शहरात वाढला आहे. परिणामी, अकरावीच्या प्रवेशासाठी स्थानिकांसह बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते.
नुकत्याच जाहीर झालेल्या वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत राजर्षी शाहू महाविद्यालयातील विविध प्रवर्गातील पहिले पाच विद्यार्थी राज्यात पहिले आले आहेत. दयानंद महाविद्यालयाच्याही विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत चांगले यश मिळविले आहे. त्यामुळे बाहेरच्या विद्यार्थ्यांना लातूरचे आकर्षण वाढले आहे. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयानेही सीईटी परीक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवल्याने तिकडेही विद्यार्थ्यांचा ओढा आहे.
लातूर शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालय आणि अहमदपुरातील महात्मा गांधी महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश मिळविण्यासाठी दरवर्षीच चढाओढ होते.
आता दहावीचा निकाल १७ जूनला लागणार असल्याने या तिन्ही महाविद्यालयांसह अन्य महाविद्यालयांनी क्षमतेनुसार प्रवेश देण्याची तयारी केली आहे. या तिन्ही नामांकित महाविद्यालयांसह अन्य महाविद्यालयेही आता स्पर्धेत आली आहेत. नुकत्याच लागलेल्या सीईटीच्या परीक्षेत ते दिसून आले आहे. (प्रतिनिधी)
पदव्युत्तर आणि संशोधनातही लातूर...
अकरावी, बारावी आणि सीईटीपुरते मर्यादित शिक्षण लातुरात आहे. पदवी, पदव्युत्तर आणि संशोधनात जिल्हा मागे आहे, असा काहींचा समज आहे. परंतु, ‘शाहू’, ‘दयानंद’, ‘बसवेश्वर’, ‘सुशिलादेवी’ विद्यापीठ उपकेंद्रांतील विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधनात आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रवेशही हाऊसफुल्ल होत आहे.
अकरावीतील प्रवेश स्थिती