आता मोबाइल ॲप लावणार वाहनांच्या अपघातांना ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:14 AM2021-07-05T04:14:05+5:302021-07-05T04:14:05+5:30

अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार प्रशिक्षण आयआरएडी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ...

Now the mobile app will be used to break vehicle accidents! | आता मोबाइल ॲप लावणार वाहनांच्या अपघातांना ब्रेक !

आता मोबाइल ॲप लावणार वाहनांच्या अपघातांना ब्रेक !

Next

अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार प्रशिक्षण

आयआरएडी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील रस्त्यांची आणि अपघात प्रवण क्षेत्राची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. ब्लॅक स्पॉट डाटाही एकत्रित केला जात आहे.

जम्पिंग रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण अधिक

लातूर जिल्ह्यात लातूर-नांदेड, लातूर-बीदर, नांदेड-बीदर, शिरूर-निजामाबाद, औसा-तुळजापूर, लातूर-अंबाजोगाई आणि लातूर-बार्शी या महामार्गाचे जाळे आहे.

लातूर-नांदेड या महामार्गावर ठिकठिकाणी जम्पिंग आणि ब्लॅक स्पॉट आहेत. अशीच परिस्थिती नांदेड-बीदर महामार्गावरील अहमदपूर ते उदगीर दरम्यान आहे. यातून अपघाताच्या घटना वाढत आहेत.

मोबाइल ॲपचा असा होणार फायदा

जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गांवर होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी मोबाइल ॲपचा विशेष फायदा होणार आहे. अपघातानंतर काही क्षणात माहिती संबंधित यंत्रणेला मिळणार आहे.

दिवसेंदिवस वाढणारे अपघात रोखण्यासाठी मोबाइल ॲप आणि डिजिटलायझेशन यंत्रणेचा विशेष उपयोग होईल. यातून अपघात कसे रोखायचे याबाबत मदत घेता येणार आहे.

Web Title: Now the mobile app will be used to break vehicle accidents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.