मातोळा आरोग्य केंद्रात परिचारिकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:18 AM2021-05-15T04:18:47+5:302021-05-15T04:18:47+5:30
... पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती औसा : उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना अन्न, पाणी उपलब्ध होत नाही. ...
...
पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती
औसा : उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना अन्न, पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे वानरांच्या टोळ्या अन्न, पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत. यंदा उन्हाळा अधिक जाणवत आहे. परिणामी, जलस्त्रोत आटले आहेत. वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. काही दिवसांपासून बेलकुंड येथील गावाच्या पूर्वेकडून व पश्चिमेस शेती असल्याने शेतात वानरे अन्न, पाण्याचा शोध घेत असल्याचे दिसत आहे.
...
शिरूर अनंतपाळ येथे किराणा साहित्य वाटप
शिरूर अनंतपाळ : काेरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे गोरगरिब संकटात आहेत. सामाजिक बांधीलकी जपत येथील अनंत काळे यांनी ५० ते ६० मुस्लिम कुटुंबीयांना साहित्याचे कीट तयार करुन वाटप केले. या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक करण्यात येत आहे.
...
ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकांचा सत्कार
निलंगा : तालुक्यातील कासारशिरसी येथील ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे सरचिटणीस धनराज होळकुंदे, जिलानी बागवान, गिरीश तुळजापूरे, श्यामराव मुळजकर, डॉ. संगीता भासेले, डॉ. विश्वेश कुलकर्णी, डॉ. विलास पाटील, डॉ. शेषेराव शिंदे, डॉ. बालाजी सावंत, शिवकन्या स्वामी, रंजना पांचाळ, सत्वशीला कांबळे, संगीता पोतरे, अरुणा जाधव, रजिया टाकळे, प्रणाली माने, सुरेखा दिलपे, पूजा गोसावी, चंद्रकला मोळकरे, नामदेव गायकवाड, दिलीप माने, महेश गरंडे, कस्तुर जानकर आदी उपस्थित होते.