ok sabha 2019 लातुरात भाजपाने अखेर चेहरा बदलला ; जि. प. सदस्य सुधाकर शृंगारेंना तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 09:05 PM2019-03-21T21:05:04+5:302019-03-21T21:27:31+5:30

ok sabha 2019 : प्रगतीपुस्तक बरे तरी खासदारांचा अपेक्षेप्रमाणे पत्ता कट

ok sabha 2019 The BJP finally changed its face; District Par. Member Sudhakar Shringarna Ticket | ok sabha 2019 लातुरात भाजपाने अखेर चेहरा बदलला ; जि. प. सदस्य सुधाकर शृंगारेंना तिकीट

ok sabha 2019 लातुरात भाजपाने अखेर चेहरा बदलला ; जि. प. सदस्य सुधाकर शृंगारेंना तिकीट

Next

लातूर : भाजपाने अपेक्षेप्रमाने चेहरा बदलला असून विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना तिकीट नाकारले आहे. दरम्यान  जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे हे आता उमेदवार असतील.

शृंगारे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील घरणी गावचे आहेत. ते राजकारणात नवखे आहेत. वडवळ नागनाथ जिल्हा परिषद गटातून ते जिपचे सदस्य झाले. त्यांच्या उमेदवारीचे पारडे जड करण्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि मतदार संघातील आमदारांचा मोलाचा वाटा आहे. खासदार गायकवाड हे मलाच तिकीट मिळणार असे वारंवार सांगत राहिले. त्यांचे प्रगती पुस्तकही बरे होते. संसदीय कामकाज आणि उपस्थितीत ते पुढे होते, असा त्यांचा दावा होता. अडीच लाखाच्या फरकाने विजयी झाले होते. मात्र त्यांच्याबद्दल स्थानिक पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सुरु उमटत होता. अमित शहा यांच्या दौऱ्यातच गायकवाड यांच्या उमेदवारीवर अनेकांनी प्रश्न चिन्ह उमवले होते. दरम्यान उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांचे नाव काही काळ चर्चेत राहिले. दिल्ली दरबारी आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळाल्याच्या पोस्ट गायकवाड यांच्या समर्थनार्थ फिरत असताना शृंगारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. उमेदवारीवरून दोन मतप्रवाह भाजपात होते. अखेर शृंगारे यांनी बाजी मारली. मुंबईत कंत्राटदार असणारे शृंगारे आता पक्षाची मोट कशी पाठीशी ठेवतात आणि कसा प्रचार रंगतो हे रंगपंचमी आधीच कळणार आहे.



 



 

Web Title: ok sabha 2019 The BJP finally changed its face; District Par. Member Sudhakar Shringarna Ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.