घरफोडीच्या गुन्ह्यातील सव्वा लाखाचे दागिने हस्तगत, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:54 PM2022-05-13T18:54:42+5:302022-05-13T18:55:32+5:30

एकाला अटक : लातूर पोलिसांची कारवाई

One and a half lakh jewelery seized in burglary case in latur | घरफोडीच्या गुन्ह्यातील सव्वा लाखाचे दागिने हस्तगत, एकाला अटक

घरफोडीच्या गुन्ह्यातील सव्वा लाखाचे दागिने हस्तगत, एकाला अटक

googlenewsNext

लातूर : शहरातील राधाकृष्ण नगर येथे एका घराचा दरवाया उघडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे एकूण १ लाख ३० हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासांत विशेष पथकाने चोरट्यांसह १ लाख ३० हजारांचे दागिने हस्तगत केले. 

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राधाकृष्ण नगर येथे घरफोडीची घटना झाली होती. या घरफोडीत १ लाख ३० हजारांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. १२ मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने रमेश राठोड (रा. कोळगाव तांडा, ता. रेणापूर) याला एका गॅरेजमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता घरफोडीचा गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या जवळील १ लाख ३० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. 

विशेष पथकाने अवघ्या पाच तासांत ही कारवाई केल्याने पथकातील पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे, सहाय्यक फौजदार रामचंद्र ढगे, वाहिद शेख, पोलीस अंमलदार महेश पारडे, काकासाहेब बोचरे यांचे कौतुक होत आहे.

Web Title: One and a half lakh jewelery seized in burglary case in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.