महावितरणची एक दिवस, एक गाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:44 AM2020-12-17T04:44:48+5:302020-12-17T04:44:48+5:30
महावितरणच्या वतीने विविध गावातील वीज विभागाशी निगडीत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी एक दिवस एक गाव ही मोहीम सुरु करण्यात आली ...
महावितरणच्या वतीने विविध गावातील वीज विभागाशी निगडीत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी एक दिवस एक गाव ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत तालुक्यातील दैठणा येथे बुधवारी महावितरणचे उपविभागीय अभियंता जोंधळे, कनिष्ठ अभियंता ए.डी. जावळे यांनी वीज कर्मचाऱ्यांसह भेट देऊन विविध समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर रोहित्र दुरुस्ती करून ज्या ठिकाणचे विद्युत खांब झुकले आहेत, ते सरळ केले. त्याचबरोबर वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी विद्युत तारेशी संपर्क होणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडल्या. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी महावितरणचे तंत्रज्ञ व्ही.बी. शिरुरे, ए.बी. भद्रे, बी.बी. जाधव, एच.व्ही. चामे, डी.एम. जाधव, एम.एम. व्यंजने यांनी परिश्रम घेतले.
तातडीने समस्यांचा निपटारा...
वीज पुरवठ्याबाबत काही समस्या असल्यास नागरिकांनी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी संबंधित गावात भेट देऊन वीजपुरवठा सुरळीत करतील, असे आवाहन उपविभागीय अभियंता जोंधळे यांनी केले. यावेळी सरपंच योगेश बिरादार, उपसरपंच सीताराम पाटील यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
***