दयानंद महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:18 AM2021-05-17T04:18:07+5:302021-05-17T04:18:07+5:30
दयानंद विज्ञान महाविद्यालय आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक आरोग्य आणि शारीरिक पैलू या ...
दयानंद विज्ञान महाविद्यालय आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक आरोग्य आणि शारीरिक पैलू या विषयावरील एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. मंचावर प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य डॉ. एस.एस.बेल्लाळे, प्रा.श्रेयश माहुरकर यांची उपस्थिती होती. डॉ. गोमारे म्हणाल्या, समाजात सकारात्मक विचाराचे बीजारोपन करून ही लढाई जिंकली पाहिजे. कोरोनाची तीव्र लक्षणे घालविण्यासाठी मदतनीस व मार्गदर्शक विद्यार्थी सहाय्यक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक डॉ. श्रेयस माहूरकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. श्वेता मदने यांनी मानले.
मदतीसाठी विद्यार्थ्यांनी पूढाकार घ्यावा...
कोरोनामूळे अनेक जण पीडित आहेत. तेव्हा समाजाचे रूण फेडावे यासाठी विद्यार्थी सहाय्यकांनी कोविड असणा-या रुग्णास मदत केली पाहिजे. स्वतःचे रक्षण करण्याबरोबर घरातील, समाजातील व्यक्ती आणि इतर सदस्यांचे संरक्षण केले पाहिजे. मानसशास्त्रीय समुपदेशन केले पाहिजे, असेही प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड म्हणाले.