औसा रोडवर बस- दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

By हरी मोकाशे | Published: August 14, 2023 12:16 PM2023-08-14T12:16:58+5:302023-08-14T12:17:16+5:30

दुचाकीवर जवळपास २६ वर्षीय एक महिला आणि लहान मुलगा होता.

One dead, one critical in bus-bike accident on Ausa Road | औसा रोडवर बस- दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

औसा रोडवर बस- दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

googlenewsNext

लातूर : शहरातील औसा रोडवरील राजीव गांधी चौकात भरधाव बस आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोलापूर- उमरगा- लातूर बस क्र. एमएच १४, बीटी १४३४ ही राजीव गांधी चौकात आली असता एमएच २४ बीएम ३७५४ या दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर जवळपास २६ वर्षीय एक महिला आणि लहान मुलगा होता. बसच्या धडकेत यातील एकाचा मृत्यू झाला. 

घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली. उपस्थित नागरिकांनी जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. अद्याप मयत व जखमीचे नाव स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: One dead, one critical in bus-bike accident on Ausa Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.