उदगीरात अवैध सावकारीप्रकरणी एकावर धाड; संशयास्पद दस्तऐवज जप्त !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 19:28 IST2022-07-21T19:27:52+5:302022-07-21T19:28:14+5:30
विजय शिवमूर्ती इदलगावे यांच्या विरोधात अवैध सावकारीबाबत तक्रार दाखल केली होती.

उदगीरात अवैध सावकारीप्रकरणी एकावर धाड; संशयास्पद दस्तऐवज जप्त !
उदगीर (जि. लातूर) : शहरातील पाच जणांनी एकाविरुध्द अवैध सावकारी प्रकरणी तक्रार दाखल केल्याने येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी शहर पोलिसांच्या मदतीने एका व्यक्तीच्या दुकानावर, निवासस्थानावर धाड टाकली. यात संशयास्पद दस्तऐवज, कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती येथील सहाय्यक निबंधक बी.एस. नांदापूरकर यांनी दिली.
उदगीर येथील महादेव चलवा, पार्वती चलवा, तुळशीदास बिरादार, जयश्री चलवा, प्रसाद चलवा, शिवकुमार चलवा यांनी विजय शिवमूर्ती इदलगावे यांच्या विरोधात अवैध सावकारीबाबत तक्रार दाखल केली होती. त्यावरुन गुरुवारी सकाळी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील दोन पथकांनी इदलगावे यांच्या निवासस्थानी आणि दुकानावर धाड टाकली. यावेळी अनेक संशयास्पद दस्तऐवज हस्तगत करण्यात आले.
या पथकात येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील व्ही.एम. सोनवणे, डी.के. वाघमारे, एस.एस. डुब्बेवार, जे.एस. चोले, आर.व्ही. कलकोटे, ए.व्ही. भोईबार, डी.एस. कांबळे, पी.एच. भंडे यांचा समावेश होता. पोलीस उपनिरीक्षक व्यंकटराव एडके, बी.एस. तपसाळे, पोलीस कर्मचारी पवन गायकवाड, महेश बामणे, सतीश पवार, मारुती जायभाये, मंगले, दाभाडे, मेकवाढ यांनी पथकास मदत केली. यावेळी अनेक दस्ताऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निबंधक बी.एस. नांदापूरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.