भरधाव हायवाने एकाला चिरडले; लातुरातील घटना : दुचाकीचालक ठार
By राजकुमार जोंधळे | Published: September 22, 2024 09:45 PM2024-09-22T21:45:59+5:302024-09-22T21:46:08+5:30
राजकुमार जाेंधळे / लातूर : भरधाव हायवाने एका दुचाकीचालकाला चिरडल्याची घटना लातुरातील नवीन रेणापूर नाका चाैकात रविवारी सायंकाळी ४ ...
राजकुमार जाेंधळे / लातूर : भरधाव हायवाने एका दुचाकीचालकाला चिरडल्याची घटना लातुरातील नवीन रेणापूर नाका चाैकात रविवारी सायंकाळी ४ वाजता घडली. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील सलगरा येथील रहिवासी भरत उद्धव माेटे (वय ३०) हे ठार झाले आहेत. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, साई गावाकडून रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लातूर शहराकडे दुचाकीवरून संसारोपयोगी साहित्य घेऊन निघालेल्या माेटे दाम्पत्याला नवीन रेणापूर नाका चौकात भरधाव हायवाने (एमएच ४४ यू ८३४४) चिरडल्याची घटना घडली. या अपघातात हायवाच्या समोरील टायरखाली आल्याने दुचाकीवरील भरत उद्धव मोटे यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबराेबर सोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली असल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले. जखमी महिलेला लातुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेनंतर वाहतुकीची कोंडी झाली हाेती. चारही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर नवीन रेणापूर नाका चाैकात एका मालवाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाच्या टायरखाली दुचाकी आल्याने एक जण जागीच ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले.