आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला पाेलीस काेठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:14 AM2021-07-05T04:14:04+5:302021-07-05T04:14:04+5:30

पाेलिसांनी सांगितले, हरंगुळ (बु.) येथील गाेविंदनगरात मुलींचे कुटुंबीय वास्तव्याला आहेत. गीतांजली आणि धनश्री या मावस बहिणी आठ दिवसांपूर्वी ...

One was sentenced to life in prison for inciting suicide | आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला पाेलीस काेठडी

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला पाेलीस काेठडी

Next

पाेलिसांनी सांगितले, हरंगुळ (बु.) येथील गाेविंदनगरात मुलींचे कुटुंबीय वास्तव्याला आहेत. गीतांजली आणि धनश्री या मावस बहिणी आठ दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता हाेत्या. त्यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले हाेते. जबाबही नाेंदविण्यात आला हाेता. मात्र, शनिवारी दाेघा मावस बहिणींनी वरच्या मजल्यावर धुणे धुण्याचा बहाणा केला. दरम्यान, काही वेळानंतर मुली का खाली येत नाहीत? म्हणून घरच्यांनी वरच्या मजल्यावर येऊन पाहिले असता, आतून दार बंद हाेते. दाराला थाप मारली, आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबीयांनी दार ताेडून आत प्रवेश केला; तर पत्र्याच्या आडूला एकाच साडीला दाेघींनी गळफास घेतल्याचे आढळून आले.

याबाबत गीतांजलीच्या वडिलांनी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पंकज सुतार याच्याविराेधात फूस लावून पळवून नेने, जीवे मारण्याची धमकी देणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी दिली.

धमकी दिल्याने मुलींनी केली आत्महत्या...

आठ दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या दाेघा मावस बहिणींना याच परिसरात वास्तव्याला असलेल्या पंकज सुतार याने फूस लावून पळवून नेले हाेते. याबाबत काेणाला काही सांगितले तर जिवे मारू, अशी धमकीही त्याने दिली हाेती. दरम्यान, पुण्यातून ताब्यात घेत पाेलिसांनी कुटुंबीयांच्या हवाली केलेल्या मुलींनी घाबरून आत्महत्या केली, असा आराेप गीतांजलीच्या वडिलांनी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे.

Web Title: One was sentenced to life in prison for inciting suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.