आठ मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १८.८४ टक्के साठा; चार प्रकल्प काेरडे

By राजकुमार जोंधळे | Published: June 18, 2023 06:10 PM2023-06-18T18:10:02+5:302023-06-18T18:15:01+5:30

१७१ पैकी ४६ प्रकल्प जोत्याखाली...

Only 18.84 percent water reserves in eight medium projects; Four project cards | आठ मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १८.८४ टक्के साठा; चार प्रकल्प काेरडे

आठ मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १८.८४ टक्के साठा; चार प्रकल्प काेरडे

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यातील माेठे, मध्यम आणि लघू अशा १४२ प्रकल्पांत १८.८४ टक्केच साठा आहे. यातील १७१ माेठे, मध्यम, लघु आणि बॅरेजसपैकी ४६ प्रकल्प सध्या ज्याेत्याखाली असून, चार काेरडे ठाक पडले आहेत. लातूर, औसा, उदगीर, निलंगा, अहमदपूर, रेणापूर, शिरूर, अनंतपाळ, देवणी, जळकाेट आणि चाकूर तालुक्यातील प्रकल्पांचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्यात यंदा अद्यापही मान्सून बसला नसून, मृग नक्षत्राचा काळ निम्म्यापेक्षा अधिक संपुष्टात आला आहे. गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांत बऱ्यापैकी साठा झालेला हाेता. मात्र, यंदा कडक उन्हाळ्यात प्रकल्पाखालील गावामध्ये टंचाई जाणवत आहे. आता पाऊस लांबल्याने, त्यातच कडक उन्हामुळे प्रकल्पातील पाण्याचा उपसा माेठ्या प्रमाणावर हाेत आहे. शिवाय, पाण्याच्या बाष्पीभवनाची गतीही वाढली आहे. परिणामी, प्रकल्पातील जलसाठ्यांमध्ये झपाट्याने घट हाेत आहे.

या प्रकल्पांतील साठा जोत्यांखाली...

गाेंदेगाव, चिकुर्डा (ता. लातूर), कारला (ता. औसा), केसगीरवाडी, कल्लूर (ता. उदगीर), निलंगा, हाडगा (ता. निलंगा), गाेताळा, धसवाडी, भुतेकरवाडी, तेलगाव, काैडगाव, पाटाेदा, खंडाळी, अंधाेरी, उगीलेवाडी, सावरगाव थाेट, हंगेवाडी, खरबवाडी (ता. अहमदपूर), गरसाेळी, खलंग्री (ता. रेणापूर), झरी, जढाळा, बेलगाव (ता. शिरूर अनंतपाळ), महाळंग्रा, हाळी (खु.) बामाजीची वाडी (ता. चाकूर), दरेवाडी, कवठाळा (ता. देवणी), जंगवाडी, हळद वाढाेणा, ढाेरसांगवी, हावरगा, चेरा (ता. जळकाेट) यांचा समावेश आहे.

मांजरा धरणामध्ये २२.४९ टक्के साठा...

लातूरला पाणीपुरवठा हाेणाऱ्या मांजरा प्रकल्पात सध्याला उपयुक्त पाणीसाठा ३९.७९५ द.ल.घ.मी. म्हणजेच २२.४९ टक्के साठा शिल्लक आहे. निम्न तेरणा प्रकल्पात उपयुक्त साठा ३१.०९७ द.ल.घ.मी. आहे. त्याची टक्केवारी ३४.०९ आहे. दाेन माेठ्या प्रकल्पांत एकूण साठा २६.४३ टक्के आहे. तावरजा, व्हटी, रेणा, तिरु, देवर्जन, साकाेळ, घरणी आणि मसलगा मध्यम प्रकल्पात एकूण १८.५४ टक्केच साठा आहे. १२८ लघु प्रकल्पात १२.४५ टक्केच साठा आहे.

जून महिन्यातच चार प्रकल्प काेरडे...

लातूर जिल्ह्यातील एकूण १४२ प्रकल्पापैकी सध्याला चार प्रकल्प काेरडे पडले आहेत. या प्रकल्पाखालील गावामध्ये, परिसरात पाणीटंचाई आहे. या प्रकल्पात येल्लाेरी (ता. औसा), हाडगा (ता. निलंगा), काेपरा-किनगाव (ता. अहमदपूर) आणि पाथरवाडी (ता. रेणापूर) यांचा समावेश आहे.

Web Title: Only 18.84 percent water reserves in eight medium projects; Four project cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.