पाळत ठेवून संधी साधली; डिक्की फोडून पावणेदाेन लाखांची राेकड पळविली
By राजकुमार जोंधळे | Published: February 24, 2023 07:32 PM2023-02-24T19:32:11+5:302023-02-24T19:33:01+5:30
बँकेतील तारण सोने सोडविण्यासाठी रोकड घेऊन जाताना झाली चोरी
लातूर : माेटारसायकलची डिक्की फाेडून १ लाख ६८ हजार रुपयांची राेकड पळविल्याची घटना लातुरातील जिल्हा परिषद परिसरात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात अज्ञाताविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी व्यंकट जळबा ताेटरे (वय ५० रा. नालंदा साेसायटी, विवेकानंद चाैक लातूर) हे बँकेत ठेवलेले साेने साेडविण्यासाठी लागणारी रक्कम १ लाख ६८ हजार रुपये माेटारसायकलच्या (एम.एच. २४ वाय ३४४७) डिक्कीत ठेवली हाेती. दरम्यान, जिल्हा परिषद लातूर येथे खाजगी कामासाठी गेले असता, इकडे चाेरट्यांनी त्यांची डिक्की फाेडून आतील राेकड पळविली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दिलेल्या जबाबावरून अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस हेड काॅन्स्टेबल चाैगुले करत आहेत.
पाळत ठेवून फाेडली डिक्की..?
व्यंकट ताेटरे यांनी बँकेतील साेने साेडविण्यासाठी आपल्या माेटारसायकलच्या डिक्कीत १ लाख ६८ हजारांची राेकड ठेवली हाेती. दरम्यान, त्यांच्यावर अज्ञातांनी पाळत ठेवत त्यांचा पाठलाग केला असावा, असा संशय पाेलिसांना आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात माेटारसायकल थांबवून ते थाेड्यावेळासाठी कामासाठी गेले हाेते. त्याचवेळी चाेरट्यांनी डिक्की फाेडली, असे पाेलिसांनी सांगितले.