टीबी फोरमच्या बैठकीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:15 AM2020-12-09T04:15:20+5:302020-12-09T04:15:20+5:30
महाआवास अभियान कार्यशाळा उत्साहात लातूर - केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी ...
महाआवास अभियान कार्यशाळा उत्साहात
लातूर - केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय आवास दिनाचे आयोजन करण्यात येते. गृहनिर्माण योजना गतिमान करण्यासाठी २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या शंभर दिवसांच्या कालावधीत अभियान राबविले जात आहे. त्याअनुषंगाने नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथील एमएस व्हॅन कक्षात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
रक्तदान शिबिरात ५१ जणांचा सहभाग
लातूर - लातूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. यावेळी शिवाजी माने, युवा सेना विस्तारक सूरज दामरे, त्र्यंबक स्वामी, राहुल मातोळकर, रवि पिचारे, संतोष माने, बंडू भट, लक्ष्मण घोणे, अमित जाधव, यशपाल चव्हाण, अमरदीप मानकोसकर, गोपाळ गव्हाणे, तानाजी करपुरे आदींसह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आनंद भवन बालविकास केंद्रात संवाद सभा
लातूर - आनंद भवन बालविकास केंद्र येथे पालक संवाद सभेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालशिक्षण अभ्यासक मारुती कदम यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिवदास शिंदे यांनी, तर आभार अनिल तापडिया यांनी मानले. यावेळी अश्विनी जोशी, श्रीराम कदम, भुजंग मुके, रणजित घुमे, उत्तम सूर्यवंशी आदींसह पालक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
बहुजन भारत पार्टीतर्फे अभिवादन
लातूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन भारत पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. व्यंकटेश कसबे, प्रा. परमेश्वर वाघमारे, दीपक साठे, नरसिंग घोडके, नागनाथ डोंगरे, शिरीष दिवेकर, जी.ए. गायकवाड, मोहनराव शिंदे, सुरेश संमुखराव, ॲड. सुनील कसबे, माधवराव सारवेकर, दयानंद वाघमारे, मारोती कसबे, विनोद गायकवाड, दत्ता वाघमारे उपस्थित होते.
शुभांगी चव्हाण यांना पुरस्कार जाहीर
लातूर - जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेने यावर्षीचा समाज गौरव पुरस्कार डॉ. शुभांगी चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष राम गायकवाड, सचिव डॉ. सुरेश वाघमारे, बसवंतअप्पा उबाळे, यु.डी. गायकवाड यांनी दिली. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार दिला जातो.