शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:14 AM2021-01-10T04:14:42+5:302021-01-10T04:14:42+5:30

येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित मुला- मुलींच्या बास्केटबॉल प्रीमियर लीगच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विचार विकास मंडळाचे ...

Outdoor sports are important for physical fitness | शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ महत्त्वाचे

शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ महत्त्वाचे

Next

येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित मुला- मुलींच्या बास्केटबॉल प्रीमियर लीगच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विचार विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड. किशनराव बेंडकुळे होते. यावेळी विचार विकास मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. शिवसांब चवंडा, ॲड. वसंतराव फड, पालिकेचे मुख्याधिकारी त्रंबक कांबळे, सहशिक्षक बाबुराव नलवाड, धरमपाल गायकवाड, दत्ता गलाले, आशिष हेंगणे, शेखर चौधरी, नजीर पठाण, राहुल गादेवार उपस्थित होते.

क्रीडा अधिकारी कसगावडे म्हणाले, ग्रामीण भागात बास्केटबॉलसारख्या खेळांना चालना देणे ही चांगली गोष्ट असून विद्यार्थ्यांना खेळाविषयी गोडी निर्माण होते. यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू भाग्यश्री बिले यांनी मनोगत व्यक्त केले. बास्केटबॉल स्पर्धेत १२ संघांनी सहभाग नोंदविला. पंच म्हणून वैभव चेंडके, गणेश पवार यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन तुकाराम पलमटे व तृप्ती गादेवार केले. शरद माने यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीसाठी महेश इंदुरीकर, सोहेल सोहेल शेख, गणेश सुरनर, कृष्णा भुतडा, जुनेद तांबोळी, अर्णव रेड्डी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Outdoor sports are important for physical fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.