उदगीरातील गरजूंना मिळणार ऑक्सिजन जनरेटर मशीन मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:34 AM2020-12-16T04:34:52+5:302020-12-16T04:34:52+5:30
संपूर्ण जगात कोरोनाचे सावट कायम आहे. कोरोना बाधित रुग्णाच्या शरीरातील प्राणवायू लवकर कमी होतो आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन जनरेटर ...
संपूर्ण जगात कोरोनाचे सावट कायम आहे. कोरोना बाधित रुग्णाच्या शरीरातील प्राणवायू लवकर कमी होतो आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन जनरेटर मशीनमुळे शहरातील रुग्णांना ऑक्सिजनची उपलब्धता होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रुग्णांना घरातच आराम मिळेल, असे अपेक्षित आहे. यासाठी गरजूंनी राज ट्रॅव्हल्स, गिरी कॉम्प्लेक्स, बसस्थानकासमोर उदगीर येथे संपर्क करावा, असे आवाहन रोटरीच्या वतीने करण्यात आले आहे. गरजूंनी डॉक्टरांचे पत्र, आधार कार्ड, ओळखपत्र यांची पूर्तता करून ही मशीन घरी घेऊन गरजूंना ऑक्सिजन उपलब्ध करून देऊ शकतात. त्यानंतर ती मशीन सुस्थितीत रोटरी क्लब उदगीर सेंट्रलला परत करावयाची आहे. जेणेकरून अन्य गरजवंतांना याची मदत होईल, असे रोटरी फाउंडेशनचे डायरेक्टर विजयकुमार पारसेवार यांनी सांगितले. यावेळी रोटरी अध्यक्ष विशाल तोंडचीरकर, सचिव कीर्ती कांबळे, उपाध्यक्ष प्रशांत मांगुळकर, पब्लिक इमेज डायरेक्टर प्राचार्य व्यंकट कणसे, चंद्रकांत ममदापुरे, भागवत केंद्रे, विशाल जैन , मंगला विश्वनाथे, ज्योती डोळे आदींची उपस्थिती होती.