शिरूर अनंतपाळ रुग्णालयास ऑक्सिजन पुरवठा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:19 AM2021-04-25T04:19:39+5:302021-04-25T04:19:39+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तालुक्यातील पाच गावांतच २०० पेक्षा जास्त बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात अचानक ...
शिरूर अनंतपाळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तालुक्यातील पाच गावांतच २०० पेक्षा जास्त बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात अचानक काहीजणांचा ऑक्सिजन कमी होत आहे. अशा रुग्णांना लातूरच्या कोणत्याही दवाखान्यात खाटा उपलब्ध होत नाहीत; म्हणून काहीजण येथील स्थानिक दवाखान्यात उपचार घेत आहेत. परंतु, या दवाखान्यास ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांसह नातेवाइकांची अडचण होत नाही. येथील रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी येथील डाॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बालाजी बिरादार यांनी केली आहे.
सरकारी दवाखान्यात सुविधा नाही...
येथील ग्रामीण रुग्णालय अद्याप सुरू नाही. आरोग्य केंद्रात ऑक्सिजन खाटांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु, त्यांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्यामुळे अडचण येत आहे. येथील दवाखान्यास ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करावा, अशी मागणी डाॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. बालाजी बिरादार यांनी केली आहे.