लातुरात तिर्रट जुगारावर पाेलीस पथकाचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:24 AM2021-08-12T04:24:03+5:302021-08-12T04:24:03+5:30
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील जुना औसाराेड परिसरातील कृषिनगरात तिर्रट नावाचा जुगार गाेलाकार स्थितीत बसून खेळला जात असल्याची माहिती पाेलिसांनी मिळाली. ...
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील जुना औसाराेड परिसरातील कृषिनगरात तिर्रट नावाचा जुगार गाेलाकार स्थितीत बसून खेळला जात असल्याची माहिती पाेलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधारे विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्याच्या पाेलीस पथकाने रविवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास अचानक छापा मारला. यावेळी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून तिर्रट जुगाराचे साहित्य, माेबाइल, दुचाकी, कार आणि राेख १८ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात पाेलीस हवालदार संजय विश्वनाथ कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस हवालदार डी. व्ही. चव्हाण करीत आहेत.
अवैध व्यवसाय बंद असल्याचा दावा...
लातूरसह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारू, मटका, गुटखा आणि जुगार सुरू असल्याची माहिती आता समाेर येत आहे. पाेलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी जिल्हाभरात धाडी टाकत लाखाे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकीकडे ठाणेप्रमुख आपल्या हद्दित अवैध व्यवसाय बंद असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे विशेष पथकांच्या धाडीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे बिंग फुटत आहे. हे काेडे न उलगडणारे आहे.