औरादच्या बसस्थानकात बसने प्रवाशाला चिरडले; चालकाविरुद्ध पाेलीस ठाण्यात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 05:54 PM2024-08-31T17:54:54+5:302024-08-31T17:55:29+5:30

औराद स्थानकात मोठ्या प्रमाणात गिट्टी उघडी पडली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशा स्थितीत स्थानक परिसरात प्रवाशांना धड चालताही येत नाही.

Passenger crushed by bus at Aurad bus stand; A case has been registered against the driver in Pallis Thana | औरादच्या बसस्थानकात बसने प्रवाशाला चिरडले; चालकाविरुद्ध पाेलीस ठाण्यात गुन्हा

औरादच्या बसस्थानकात बसने प्रवाशाला चिरडले; चालकाविरुद्ध पाेलीस ठाण्यात गुन्हा

औराद शहाजानी : बसने चिरडल्याने व्यंकट बळीराम कांबळे (वय ८३) हा प्रवासी ठार झाल्याची घटना औराद शहाजानी येथील बसस्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी बसस्थानकात सकाळी निलंगा-औराद शहाजानी-हुलसूर बस (एम.एच. २० बी.एल. ३८३७) निघाली हाेती. दरम्यान, व्यंकट कांबळे या प्रवाशाच्या अंगावरून बसचे टायर गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने औराद शहाजानी येथील आराेग्य प्राथमिक केंद्रात दाखल केले असता, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घाेषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पोतदार यांनी केले. याबाबत औराद पाेलीस ठाण्यात दिगंबर व्यंकट कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बसचालक शिवराज हत्तरगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्दन काळे हे करीत आहेत.

स्थानक नियंत्रकांनी दिली घटनास्थळी भेट
निलंगा येथील स्थानक नियंत्रक अनिल बिडवे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. मयताच्या नातेवाईकांना महामंडळाच्या वतीने दहा हजारांचा मदत निधी दिला. औराद स्थानकात मोठ्या प्रमाणात गिट्टी उघडी पडली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशा स्थितीत स्थानक परिसरात प्रवाशांना धड चालताही येत नाही. जीव मुठीत घेऊन प्रवाशांना वावरावे लागते. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.

Web Title: Passenger crushed by bus at Aurad bus stand; A case has been registered against the driver in Pallis Thana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.