लातूर नजीक रस्त्यावरील खड्डयाने दुचाकीस्वाराचे घेतले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:44 PM2018-08-22T12:44:10+5:302018-08-22T12:46:02+5:30
लातूर ते चाकूर मार्गावर घरणी नजिक झालेल्या एका अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
चाकूर (लातूर) : लातूर ते चाकूर मार्गावर घरणी नजिक झालेल्या एका अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. गंगाधर नारायण घोरपडे (४५) असे मृताचे नाव असून ते उजळंब येथील रहिवासी होते. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, गंगाधर नारायण घोरपडे हे उजळंब येथे एका शाळेवर लिपिक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी शाळेच्या कामासाठी ते दुचाकीवरून लातूरला गेले होते. घोरपडे रात्री काम आटोपून उजळंबला परतत असताना घरणी नजिक राष्ट्रीय महामार्गावर खड्डयामुळे त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात ते जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पोलिस निरिक्षक रामेश्वर तट, पोहेकॉ हणमंत आरदवाड, जगन्नाथ भंडे यांनी घटनास्थळी पाहणी व पंचनामा केला.
लातूर ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गाला प्रचंड खड्डे पडली आहेत. विशेषतः चाकूर विश्रामगृह ते तहसील कचेरीपर्यंतच्या रस्त्यावर फारच खड्डे पडली आहेत. या आधी या ठिकाणी अनेकांचे अपघातात जीव गेले आहेत. नारायण घोरपडे हेही याच खुड्याचे बळी ठरल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.