कोविड सेंटरमधील रुग्णांना सहन करावा लागतोय उकाड्याचा त्रास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:20 AM2021-04-27T04:20:10+5:302021-04-27T04:20:10+5:30
जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर - २० उपचार घेत असलेले रुग्ण - १८५५ एप्रिलमध्ये तापमानात वाढ... मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये ...
जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर - २०
उपचार घेत असलेले रुग्ण - १८५५
एप्रिलमध्ये तापमानात वाढ...
मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमान ३८ अंशावर पोहोचले असल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहावयास मिळत असून, कडक उन्हाने अंगाची लाहीलाही होत आहे. सध्याच ३८ अंशावर तापमान असल्याने आगामी काळात यात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, उकाड्याने नागरिकांसह कोविड सेंटरमधील रुग्ण त्रस्त आहेत.
जनरेटरची व्यवस्था हवी...
कोविड केअर सेंटरमध्ये जास्तीत जास्त दहा दिवस ठेवले जाते. सध्या उन्हाची तीव्रता अधिक असल्याने दुपारच्या वेळी उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.त्यातच रात्रीच्या वेळी अचानक वीज गूल होत असल्याने गैरसोय होते. तरुणांसह ज्येष्ठ नागरिक कोविड सेंटरमध्ये उपचार घेतात त्यांची गैरसोय टाळण्यासाठी जनरेटरची तरी व्यवस्था हवी. गौतम, रुग्ण
कक्षातील पंखेही नादुरुस्त...
शहरातील एका कोविड सेंटरमध्ये रुग्ण उपचार घेत असलेल्या कक्षात पंखे बंद आहेत. वारंवार सांगूनही दुरुस्ती केलेली नाही. वाढत्या उन्हामुळे उकाड्याचा त्रास जाणवत आहे. इतर सुविधा चांगल्या आहेत केवळ उन्हामुळे गरमीचा त्रास सहन करावा लागतोय. याकडे संबधित यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. अभिजित, रुग्ण