किनगावातील पीर गैबीबाबा उरूस रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:01 AM2021-01-08T05:01:59+5:302021-01-08T05:01:59+5:30
किनगाव व पंचक्रोशीत पीर गैबीबाबा यात्रा प्रसिद्ध आहे. या उरुसात लातूरसह परभणी, बीड, नांदेड व राज्यातील विविध भागांतून तसेच ...
किनगाव व पंचक्रोशीत पीर गैबीबाबा यात्रा प्रसिद्ध आहे. या उरुसात लातूरसह परभणी, बीड, नांदेड व राज्यातील विविध भागांतून तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून व्यापारी, मल्ल सहभागी होतात. या यात्रेत कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होत असते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीर गैबीबाबा उरूस रद्द करण्यात आला आहे. केवळ १३ ते १६ जानेवारी या कालावधीत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. १३ रोजी रात्री संदलचा कार्यक्रम सरपंच व मुथवली (पुजारी) यांच्या हस्ते होणार आहे. १५ रोजी जिरायत कार्यक्रम सकाळी १० वा. होणार आहे. या उरुसाला अनेक वर्षांची परंपरा असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे ग्रामपंचायत कमिटी व सरपंच किशोर मुंडे यांनी सांगितले. यावेळी बाबुभाई मिस्त्री, महेताब पठाण, हाफिज मोमीन, दशरथ कांबळे, श्रीरंग पत्की, मंजूर देशमुख, निजाम शेख, अन्वर पठाण, सलीम चौधरी, रहमतमियाँ देशमुख, पंडितराव बोडके आदींची उपस्थिती होती.