कारेपूर-किनगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:35 AM2020-12-16T04:35:01+5:302020-12-16T04:35:01+5:30
: तालुक्यातील कारेपूर फाटा ते किनगाव या मार्गाची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, रस्त्यात ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. ...
: तालुक्यातील कारेपूर फाटा ते किनगाव या मार्गाची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, रस्त्यात ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. परिणामी, वाहनधारकांसह स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे.
लातूर,रेणापूर, कारेपूर येथील नागरिकांना अहमदपूरव आणि चाकूरला जाण्यासाठी हा मार्ग अधिक जवळचा आहे. त्याचबरोबर लातूर, रेनापूर, कारेपूर, किनगाव, अहमदपूर या परिसरातील ग्रामस्थांना, वाहनधारकांना हा महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्याची दुरवस्था गेल्या अनेक दिवसांपासून झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी माेठ-माेठे खड्डे पडले आहेत. रस्ता पूर्णत: उखडला आहे. लातूर ते किनगाव हा ५५ किलोमिटर लांबीचा रस्ता आहे. या मार्गावरील अनेक गावांना हा मार्ग दळणवळणासाठी महत्वाचा आहे. या रस्त्यावरुन वाहन चालविणे म्हणजे माेठी कसरत करावी, लागते. कारेपूर फाटा ते खलंग्री, गोढाळा, किनगावपर्यंत १५ किलोमीटरच्या रस्तावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खडडीच उघडी पडली आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
एकच कंत्राटदार, कामाला विलंब...
रेणापूर तालुक्यातील खड्डे दुरुस्तीसाठी एकच कंत्राटदार असल्यावने खराब रस्त्यांची डागडुजी, खड्डे बुजवण्याचे काम वेळेवर हाेत नाही. परिणामी, तालुक्यात अनेक रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी वेळ लागत आहे. एकच कंत्राटदार असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कारेपूर फाटा ते किनगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
नव्या रस्त्याच्या कामाला मंजुरी...
सदरच्या रस्त्याचे काम मंजूर असून, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर यासाठी लागणारा निधी सध्याला उपलब्ध नाही. हा रस्ता नव्याने हाेणार आहे. यासाठी किमान तीन महिने वाट पहावी लागणार आहे. त्यानंतरच या रस्याच्या कामाला प्रारंभ हाेइल, असे सूत्रांनी सांगितले.
दुरुस्तीला लागताेय वेळ...
रस्त्याच्या कामाला मंजुरी असून, सध्याला निधी उपलब्ध नाही. त्यामुळे रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला नाही. तालुक्यात एकच कंत्राटदार असल्याने खड्डे बुजवण्यासाठी वेळ लागत आहे. आठ दिवसात खड्डे बुजिवण्याचे काम सुरू होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अनिल सोनवणे म्हणाले.