२८०० झाडांचे मियावॉकी पद्धतीने वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:14 AM2021-07-21T04:14:52+5:302021-07-21T04:14:52+5:30

समाधान शिबिरातून निराधारांना मिळतेय गावातच सेवा लातूर : ग्रामीण भागातील संगांयो-इंगांयोच्या पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनेचा थेट लाभ देण्यासाठी लातूर ...

Planting of 2800 trees by Miyawaki method | २८०० झाडांचे मियावॉकी पद्धतीने वृक्षारोपण

२८०० झाडांचे मियावॉकी पद्धतीने वृक्षारोपण

googlenewsNext

समाधान शिबिरातून निराधारांना मिळतेय गावातच सेवा लातूर : ग्रामीण भागातील संगांयो-इंगांयोच्या पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनेचा थेट लाभ देण्यासाठी लातूर ग्रामीण संगांयो समितीने पुढाकार घेतला असून, लातूर तालुक्यातील टाकळी बु. येथे समाधान शिबिर घेतले. यावेळी संगांयो समितीचे चेअरमन प्रवीण पाटील, सदस्य धनंजय वैद्य, उपसभापती प्रकाश उफाडे, वसंतराव उफाडे, सरपंच शशिकांत सोट पाटील, अशोक उफाडे, उपसरपंच विशाल उफाडे, मंडळ अधिकारी त्र्यंबक चव्हाण, तलाठी राठोड, नरसिंग दरकसे, माजी सरपंच शिरीष गांधले, तांदुळवाडीचे उपसरपंच प्रवीण कोद्रे, राहूल पाचेगावकर, गजानन पाटील, मुनीर शेख, सालार शेख, भाऊसाहेब पाटील, लक्ष्मण उफाडे, रामचंद्र साळुंके, संजय उफाडे आदींसह टाकळी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड यांचा सत्कार

लातूर : येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. श्रीकांत गायकवाड यांची जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांचा महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॅा.सिद्राम डोंगरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.डॅा.बाळासाहेब गोडबोले, प्रा.डॅा.रत्नाकर बेडगे, प्रा.डॅा.भास्कर नल्ला रेड्डी व प्रा.डॉ.संजय गवई यांची उपस्थिती होती. निवडीबद्दल महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे, उपाध्यक्ष ॲड. भूपेश पाटील, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र तिरपुडे, सरचिटणीस सुजीत मुरबाडे आदींसह पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

साठे चौक ते शाहू चौक रस्ता दुरुस्त करा

लातूर : दुरवस्था झालेला शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते शाहू चौकापर्यंतचा रस्ता १ ऑगस्टपर्यंत दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा असंघटित कामगार काँग्रेसच्या महानगरपालिकेला निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर नागेश वाघमारे, संजय सोनकांबळे, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप गायकवाड, बालाजी कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Planting of 2800 trees by Miyawaki method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.