Plastic Ban : स्वागताचे बुके देणे अंगलट; लातुरात प्रकल्प संचालकांना पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:38 AM2018-06-26T06:38:01+5:302018-06-26T06:38:06+5:30

केंवर प्लास्टिकचे आवरण असल्याचे आढळून आल्याने महापालिकेच्या पथकाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़

Plastic Ban: Welcome backpack; Five thousand penalty for project directors in Latur | Plastic Ban : स्वागताचे बुके देणे अंगलट; लातुरात प्रकल्प संचालकांना पाच हजारांचा दंड

Plastic Ban : स्वागताचे बुके देणे अंगलट; लातुरात प्रकल्प संचालकांना पाच हजारांचा दंड

Next

लातूर : जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सोमवारी आयोजित बैठकीस उपस्थित मान्यवरांना देण्यासाठी आणण्यात आलेल्या बुकेंवर प्लास्टिकचे आवरण असल्याचे आढळून आल्याने महापालिकेच्या पथकाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़
राज्यात शनिवारपासून प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली आहे़ शहर महानगरपालिकेने पहिल्या दिवशी ७० किलो प्लास्टिक जमा करून एका व्यापाऱ्यास दंड सुनावला होता़ सोमवारी पालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली़ जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खा़डॉ़ सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीसाठी खासदारांबरोबर आमदार, जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत करण्यासाठी बुके खरेदी करण्यात आले होते़ हे बुके सभागृहात आणल्यानंतर त्यावर प्लास्टिकचे आवरण असल्याचे आढळून आले़ त्यामुळे महापालिकेच्या पथकाने प्लास्टिकबंदीचे उल्लंघन झाल्याच्या कारणावरून प्रकल्प संचालकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़
बीडमध्ये किराणा व्यापाºयाला दंड
बीड : प्लास्टिक बंदीच्या तिसºया दिवशी बीड शहरात एका किराणा दुकानातील ५५ किलो प्लास्टिक व कॅरीबॅग जप्त करुन विक्रेत्याला ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
उस्मानाबादला तीन व्यापाºयांना दंड
उस्मानाबाद : प्लास्टिकबंदीच्या तिसºया दिवशी तुळजापूर शहरात सोमवारी दोन व्यापाºयांकडे प्लास्टिक सापडले़ त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला़ उस्मानाबाद शहरात रविवारी रात्री एका व्यापाºयाकडे प्लास्टिक आढळून आल्याने ५ हजारांचा दंड करण्यात आला.
नांदेडमध्ये चौघांना दंड
नांदेड : प्लास्टिक बंदी आदेशाचे उल्लंघन करणाºया सिडको, हिंगोलीगेट भागातील चार व्यापाºयांना महापालिकेने दंड ठोठावला आहे. या व्यापाºयांकडून प्रत्येकी पाच हजार असा एकूण २० हजारांचा दंड वसूल केला आहे. नांदेडमध्ये महापालिकेने तीन दिवसात १ लाख ३२ हजार ५०० रुपयांची दंड वसुली केली आहे.
प्लास्टिक बंदीच्या तिसºया दिवशी औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि जालन्यात एकही कारवाई झाली नाही. मराठवाड्यात औरंगाबाद आणि हिंगोलीत बंदीनंतर कारवाईचा श्रीगणेशाही झाला नाही.

Web Title: Plastic Ban: Welcome backpack; Five thousand penalty for project directors in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.