खेळाडू वृत्ती वाढीस लागणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:16 AM2021-01-09T04:16:13+5:302021-01-09T04:16:13+5:30
चाकूर : अलिकडील काळात ग्रामीण भागातून खेळाडूंची संख्या कमी होत आहे. मात्र, आरोग्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या ...
चाकूर : अलिकडील काळात ग्रामीण भागातून खेळाडूंची संख्या कमी होत आहे. मात्र, आरोग्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी केले.
येथील राजे संभाजी क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित ‘राजे संभाजी प्रीमियर लीग’ स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सभापती रोहिदास वाघमारे, चेअरमन विठ्ठलराव माकणे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, बालाजी पाटील चाकूरकर, सिद्धेश्वर पवार, पंचायत समिती सभापती जमुना बडे, उपसभापती सज्जनकुमार लोणाळे, माजी सभापती प्रशांत पाटील, माजी उपसभापती अशोकराव चिंते, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बैनगिरे, नितीन रेड्डी, ॲड. संतोष माने, रवींद्र नीळकंठ, प्रशांत बिबराळे, अभिमन्यू धोंडगे, मेघराज बाहेती, हर्षवर्धन कसबे, विठ्ठल धोंडगे, गजानन करेवाड उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीतेसाठी राजे संभाजी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील, नंदकुमार डाके, नामदेव नवरखेले, सचिन जाधव, सुमीत होनकर, विशाल पाटील, बालाजी पाशिमे, प्रदीप उमाटे, कुमार साळुंखे, दत्ता माने, भार्गव जोशी, मन्मथ कापसे, बाळू नागराळे, रमेश मानपाडे, तुकाराम मानपाडे, नागनाथ नाकाडे, मारुती पवार, विष्णू नाईकवाडे, तानाजी आरदवाड आदी परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेतील विजेत्याला ५१ हजार रुपये, उपविजेत्याला २५ हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला ११ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.