लातूरमध्ये ८० विद्यार्थ्यांना विषबाधा
By admin | Published: October 15, 2016 04:05 AM2016-10-15T04:05:44+5:302016-10-15T04:05:44+5:30
माध्यान्ह भोजनातून ८० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी सलगरा (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. विद्यार्थ्यांना लातूरच्या
लातूर : माध्यान्ह भोजनातून ८० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी सलगरा (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. विद्यार्थ्यांना लातूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
लातूरपासून २२ कि.मी. अंतरावरील या गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंतची शाळा आहे. शुक्रवारी दुपारी १.१५च्या सुमारास विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराअंतर्गत वरण-भात देण्यात आला. साधारणपणे अर्ध्या तासाने काही विद्यार्थ्यांना मळमळ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ८० विद्यार्थ्यांना तात्काळ लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यापूर्वी शाळेतील तीन शिक्षकांनी अन्नाची चव घेतली होती. मुलाच्या ताटात पाल आढळल्यानंतर आम्ही तात्काळ भोजन वाटप बंद केले, असे प्रभारी मुख्याध्यापक के.बी. जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)