दहा दुचाकीसह पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या, स्थागुशाची कारवाई

By राजकुमार जोंधळे | Published: April 13, 2023 08:27 PM2023-04-13T20:27:53+5:302023-04-13T20:27:53+5:30

आरोपीकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त.

police arrested thief with 10 two wheelers in latur | दहा दुचाकीसह पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या, स्थागुशाची कारवाई

दहा दुचाकीसह पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या, स्थागुशाची कारवाई

googlenewsNext

लातूर: शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील एकाला दहा दुचाकीसह अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीत चार गुन्हे उघड झाले आहेत. पोलिसांनी सांगितले, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने टोळीचा, चोरत्यांचा शोध घेतला.

विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या, रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची माहिती घेतली असता, खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे, गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिवाजी नगर ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात चोरलेली दुचाकी घेऊन संशयित सचिन दयानंद गायकवाड हा नवीन नांदेड नाका, गरुड चौक परिसरात फिरताना अटक केली. अधिक चौकशी केली असता सचिन दयानंद गायकवाड (वय २० रा. बौद्ध नगर लातूर) असे नाव असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यात असलेली स्प्लेंडर दुचाकी काही दिवसापूर्वी लातूर शहरातून चोरी केलेली होती.

तर लातूर शहरातील विविध ठिकाणाहून त्याच्या आणखीन साथीदार श्रीधर कचरू कसबे (वय २२, रा. जयनगर, लातूर) यांच्यासोबत मिळून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेत त्यांनी लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या दुचाकीबाबत विचारपूस केली. अटकेतील आरोपीकडून चोरीच्या आणखीन इतर ९ विविध कंपनीच्या दुचाकी असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्याचबरोबर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यातील चार गुन्हे उघड झाले आहेत. 

ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार सुधीर कोळसुरे, राम गवारे, मोहन सुरवसे, प्रमोद तरडे, योगेश गायकवाड, मनोज खोसे, राहुल कांबळे, चंद्रकांत केंद्रे, राजेश कंचे यांच्या पथकाने केली.

Web Title: police arrested thief with 10 two wheelers in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.