६ जुगाऱ्यांना पाेलिसांनी पकडले; पावणेदाेन लाखाचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: January 9, 2023 04:05 PM2023-01-09T16:05:53+5:302023-01-09T16:06:51+5:30
लातूर तालुक्यातील ममदापूर तलावाच्या परिसरात सुरु होता जुगार
लातूर : सुरू असलेल्या जुगारावर पाेलिस पथकाने छापा मारल्याची घटना ममदापूर (ता. लातूर) शिवारात घडली. यावेळी ६ जुगाऱ्यांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून १ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील ममदापूर तलावाच्या पाळूवर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती खबऱ्याने पाेलिस पथकाला दिली. याबाबत जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांच्या आदेशानुसार लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक गणेश कदम यांच्या पथकाने अचानकपणे छापा मारला. यावेळी एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. हे सहा जण गाेलाकारात स्वत:च्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत आणि खेळवीत असताना आढळून आले. यावेळी पथकाने त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह राेख रक्कम आणि वाहने असा एकूण १ लाख ७३ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये सहा जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पाेलिस उपनिरीक्षक तानाजी पाटील, पाेलिस उपनिरीक्षक नागनाथ पांढरे, विनाेद लखनगीरे, पाेहेकाॅ. बाबू येणकुरे, सय्यद, महेबूब तांबाेळी, पाेलिस नाईक सचिन चंद्रपाटले, पाेलिस काॅन्स्टेबल अक्षय डिगाेळे, कुंडलिक खंडागळे, चालक हजारे यांच्या पथकाने केली.