पाच लाखाच्या लाच प्रकरणी तीन दिवसाची पोलीस कोठडी

By राजकुमार जोंधळे | Published: February 15, 2024 08:11 PM2024-02-15T20:11:58+5:302024-02-15T20:12:14+5:30

या प्रकरणात सरकार पक्षाकडून ॲड. महेश पाटील यांनी काम पाहिले.

Police custody for three days in a bribery case of Rs.5 lakh | पाच लाखाच्या लाच प्रकरणी तीन दिवसाची पोलीस कोठडी

पाच लाखाच्या लाच प्रकरणी तीन दिवसाची पोलीस कोठडी

अहमदपूर (लातूर): लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात तब्बल पाच लाखाची लाच स्विकारताना बुधवारी सायंकाळी रंगेहाथ अडकलेले नगररचनाकार अजय कस्तुरे आणि अहमदपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना गुरुवारी अहमदपूर न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश वडगावकर यांनी १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पोलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील मरशिवणी येथील सर्वे नंबर ५६ मध्ये ३ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्राचा व्यवसाय करण्यासाठी अंतिम परवानगीचा प्रस्ताव तक्रारदाराने अहमदपूर नगरपरिषदेकडे ऑनलाईन चलन भरून सादर केला होता. मात्र, हे काम लवकर होत नव्हते म्हणून तक्रारदाराने नगररचनाकार यांच्याशी पैशाची बोलणी करून, प्रत्यक्ष लाच स्वीकारत असताना लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहास पकडले. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना गुरुवारी अहमदपूर येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश वडगावकर यांनी मुख्याधिकारी डोईफोडे, नगर रचनाकार अजय कस्तुरे याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाकडून ॲड. महेश पाटील यांनी काम पाहिले.

Web Title: Police custody for three days in a bribery case of Rs.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.