लातूरमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची ‘प्रबोधन शाळा’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 08:26 PM2023-03-11T20:26:40+5:302023-03-11T20:27:18+5:30

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक मेसेज, पोस्ट आणि फोटोवर आता पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर आहे.

Police 'enlightenment school' to prevent crime in Latur | लातूरमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची ‘प्रबोधन शाळा’

लातूरमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची ‘प्रबोधन शाळा’

googlenewsNext

राजकुमार जोंधळे 

लातूर : फेसबुक, इन्स्टाग्रामवर आपली अल्पवयीन मुले फोटो अपलोड करतात, व्हायरल करतात. त्यांच्या हातात गावठी कट्टा, कत्ती, तलवार दिसून येते. त्याचबरोबर तलवारीने केक कापून वाढदिवस सेलिब्रेट केला जातो. फोटो सोशल मीडियात व्हायरल केले जातात. अशावेळी ‘ती’ अल्पवयीन मुले गुन्हेगारी विश्वाकडे वळतात. त्यांना वेळीच रोखण्यासाठी लातूर पोलिसांनी ‘साभार परत’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्यासाठी दर शनिवारी ‘प्रबोधन शाळा’ भरविली जात आहे. या शाळेत पालक आणि गुन्हेगारी विश्वाकडे वळलेल्या मुलांचे समुपदेशन केले जात आहे. त्यांना समज देत ‘साभार परत’ प्रमाणपत्र प्रदान केले जात आहे. आता या शाळेची जिल्हाभरात चांगली सकारात्मक चर्चा आहे.

‘त्या’ बालकांसाठी पोलीस बनले शिक्षक...

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक मेसेज, पोस्ट आणि फोटोवर आता पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर आहे. अल्पवयीन मुलांकडून अलीकडे मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत आहेत. त्यांना या गुन्हेगारी विश्वातून बाहेर काढण्यासाठी, गुन्हेगारी विश्वाच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांना परत बोलावण्यासाठी लातूर पोलिसांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी, त्यांना चांगला मार्ग दाखविण्यासाठी ‘प्रबोधन शाळेत’ पोलीस शिक्षक बनून विशेष मार्गदर्शन करीत आहेत.

गुन्हेगारीमुळे त्यांच्या आयुष्याची झाली दशा...

गुन्हेगारीमुळे आयुष्याला मिळणारी ‘दिशा आणि दशा’ याबाबत समुपदेशन केले जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचा भाग म्हणून दर शनिवारी गांधी चौकात असलेल्या पोलिस उपाधीक्षकांच्या कार्यालयातील ‘प्रबोधन शाळा’ सकारात्मक बदल घडवत आहे.

पोलिसांकडून पालकांना ‘साभार परत’ प्रमाणपत्र...

तुमचा मुलगा गुन्हेगारीकडे वळत आहे. तो गुन्हेगारीचे उदात्तीकरण करीत आहे. आताच सावध व्हा... आणि तुमच्या मुलाला या गुन्हेगारी वृत्तीपासून दूर ठेवा, असा मजकूर असलेले प्रमाणपत्र पोलिसांकडून दर शनिवारी भरणाऱ्या ‘प्रबोधन शाळेत’ पालकांना प्रदान केले जात आहे. यातून पालक-मुलांमध्ये बदल घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Police 'enlightenment school' to prevent crime in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर