रेणापूर शहरातील अवैध व्यवसायावर पोलिसांच्या धाडी; लाखोंचा गुटखा जप्त

By राजकुमार जोंधळे | Published: March 20, 2024 02:09 PM2024-03-20T14:09:37+5:302024-03-20T14:10:13+5:30

रेणापूर शहरासह तालुक्यातील काही गावांत अवैध दारूविक्री, गुटखा विक्री आणि ऑनलाइन, माेबाइल मटका आदी माेठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे पाेलिसांनी टाकलेल्या धाडीतून समाेर आले आहे.

Police raid on illegal business in Renapur city; Lakhs of Gutkha seized | रेणापूर शहरातील अवैध व्यवसायावर पोलिसांच्या धाडी; लाखोंचा गुटखा जप्त

रेणापूर शहरातील अवैध व्यवसायावर पोलिसांच्या धाडी; लाखोंचा गुटखा जप्त

लातूर : रेणापूर शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर विशेष पाेलिस पथकाने एकाच रात्री तीन ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडीमध्ये पाेलिसांच्या हाती लाखाे रुपयांचा अवैध गुटखा, मटक्याचे साहित्य, राेख रक्कम, असा मुद्देमाल लागला आहे. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाेलिसांनी सांगितले, रेणापूर शहरात माेठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू असून, याची माहिती खबऱ्याने सहायक पाेलिस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांना दिली. या माहितीच्या आधारे माेठा फाैजफाटा घेऊन त्यांनी रेणापुरातील दाेन पान मटेरिअलच्या दुकानांवर आणि घरांवर धाडी टाकल्या. शिवाय, रेणापूर शहरातील बाजारात ऑनलाइन मटका अड्ड्यावरही पाेलिसांनी एकाचवेळी धाडी टाकल्या. या धाडींमध्ये लाखाे रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. मुद्देमालाची माेजदाद पूर्ण झाल्यानंतरच किती लाख रुपयांचा हा गुटखा आहे, याचा आकडा समाेर येणार आहे, असे एका पाेलिस कर्मचाऱ्याने सांगितले.

याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित अन्न व औषधी प्रशासन विभागाला पत्र दिले असून, त्यांचे अधिकारी आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, असे रेणापूर पाेलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे यांनी सांगितले.

अवैध व्यवसाय करणाऱ्यांना झटका...
रेणापूर शहरासह तालुक्यातील काही गावांत अवैध दारूविक्री, गुटखा विक्री आणि ऑनलाइन, माेबाइल मटका आदी माेठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे पाेलिसांनी टाकलेल्या धाडीतून समाेर आले आहे. चाकूर उपविभागाचे सहायक पाेलिस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी माेठा फाैजफाटा घेऊन रेणापुरातील गुटखा विक्री करणाऱ्यांच्या दुकानावर, घरावर आणि ऑनलाइन मटका अड्ड्यावर धाड टाकली. या धाडीतून पाेलिसांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांना चांगलाच झटका दिला आहे.

Web Title: Police raid on illegal business in Renapur city; Lakhs of Gutkha seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.