ऑटाेमाेबाईल्स दुकानात सापडला ५१ किलाे गांजा; तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 07:38 PM2020-12-19T19:38:25+5:302020-12-19T19:42:25+5:30
मुरुड येथील लातूर-बार्शी महामार्गावर असलेल्या एका ऑटाेमाेबाईल्स दुकानात पोलिसांचा छापा
लातूर : जिल्ह्यातील मुरुड येथे एका ऑटाेमाेबाईल्सच्या दुकानावर छापा मारुन पाेलिसांनी ५१ किलाे गांजासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यावेळी दाेन वाहनांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत मुरुड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, मुरुड येथील लातूर-बार्शी महामार्गावर असलेल्या एका ऑटाेमाेबाईल्स दुकानात गांजा दडवून ठेवल्याची गुप्त माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे लातूर येथील विशेष पोलीस पथक, मुरुड पाेलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने शनिवारी पहाटे ऑटाेमाेबाईल्सच्या दुकानावर छापा मारला. यावेळी तीन पाेत्यामध्ये ५१ किलाे बी मिश्रीत गांजा, वाहतुकीसाठी वापरलेली दाेन वाहने असा एकूण १० लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ऑटाेमाेबाईल्स दुकान मालक गाेविंद दिगांबर खाेसे (३५ रा. माटेफळ), युवराज तात्याराव काळे (३० रा. दत्तनगर, मुरुड) आणि सुनिल राेहिदास शिंदे (२३ रा. मांडवा ता. वाशी जि. उस्मानाबाद) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर गांजाबाबत गाेविंद खाेसे याच्याकडे अधिक चाैकशी केली असता, युवराज काळे, सुनिल शिंदे यांनी त्यांच्या वाहनातून बाहेरगावाहून गांजा घेवून आले असून, हा गांजा लातूर येथे आवश्यकतेनुसार माझ्या वाहनातून वाहतूक करुन विक्री केला जात असल्याची कबुली दिली. याबाबत मुरुड पाेलीस ठाण्यात सहायक पाेलीस निरीक्षक महादेव गाेमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लातूर शहर उपविभागीय पाेलीस अधिकारी सचिन सांगळे करीत आहेत.