पोलिसांचा पाच ठिकाणी छापा; शेकडो लिटर हातभट्टी, रसायन जप्त

By संदीप शिंदे | Published: December 16, 2023 05:02 PM2023-12-16T17:02:07+5:302023-12-16T17:02:32+5:30

उदगीर ग्रामीण पोलीसांची कारवाई : पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Police raided five places; Hundreds of liters of hand furnaces, chemicals seized | पोलिसांचा पाच ठिकाणी छापा; शेकडो लिटर हातभट्टी, रसायन जप्त

पोलिसांचा पाच ठिकाणी छापा; शेकडो लिटर हातभट्टी, रसायन जप्त

उदगीर : येथील ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी उदगीर तालुक्यातील सोमला, काशीराम तांडा आणि मारोती तांडा येथे पाच ठिकाणी छापा टाकुन गावठी हातभट्टीची दारू आणि गुळ मिश्रीत रसायन जप्त करून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रदीप घोरपडे, नामदेव धुळशेट्टे, नामदेव चेवले, संध्या कुलकर्णी, संतोष शिंदे, परमेश्वर वागदकर यांच्या पथकाने गुरुवारी सोमला, काशीराम तांडा येथे चार ठिकाणी आणि मारोती तांडा येथे हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणी धाड टाकून कारवाई केली. त्यात आरोपी शालुबाई राजाराम चव्हाण यांच्या स्वयंपाक घराच्या रूममध्ये २० लिटर्स गावठी हातभट्टीची दारू, १२० लिटर्स गुळ मिश्रित रसायन असा ८ हजार रुपयांचा मुद्देमाल, दीपक नामदेव चव्हाण याच्या ताब्यातून ९ हजार रुपये किंमतीचे १५ लिटर्स गावठी हातभट्टीची दारू आणि १५० लिटर्स गुळ मिश्रित रसायन, राजाबाई लालू चव्हाण यांच्या ताब्यातून २५०० रुपयांचे १० लिटर्स हातभट्टीची दारू आणि ३० लिटर्स गुळ मिश्रित रसायन, कलुबाई बजरंग राठोड यांच्या ताब्यातून ६५०० किंमतीचे १५ लिटर्स हातभट्टीची दारू आणि १०० लिटर्स गुळ मिश्रित रसायन जप्त केले.

तसेच सरुबाई किशन चव्हाण यांच्या ताब्यातून २ हजार रुपये किंमतीची २० लिटर्स हातभट्टीची दारू असा एकूण ५ जणांकडून २८ हजार रुपये किंमतीची ८० लिटर्स गावठी हातभट्टीची दारू आणि ४०० लिटर्स गुळ मिश्रित रसायन जप्त करण्यात आले आहे. या पाच जणांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police raided five places; Hundreds of liters of hand furnaces, chemicals seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.