निलंग्यात पोलिसांचा दुचाकीवरून रुट मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:19 AM2021-04-25T04:19:30+5:302021-04-25T04:19:30+5:30

पोलीस निरीक्षक अनिल चोरमले व पोलीस उपनिरीक्षक एच. एम. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा रुट मार्च काढण्यात आला होता. यावेळी ...

Police route route from Nilanga on two-wheeler | निलंग्यात पोलिसांचा दुचाकीवरून रुट मार्च

निलंग्यात पोलिसांचा दुचाकीवरून रुट मार्च

googlenewsNext

पोलीस निरीक्षक अनिल चोरमले व पोलीस उपनिरीक्षक एच. एम. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा रुट मार्च काढण्यात आला होता. यावेळी प्रत्येक गल्लीतून १२ मोटारसायकलवरून २४ पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन केले. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक असेल तरच मास्क लावून, फिजिकल डिस्टन्स ठेवून घराबाहेर पडावे. विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये, अन्यथा आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. छोट्या गल्लीतील चार दुकानदारांनी दुकाने उघडी ठेवल्यामुळे त्यांना प्रत्येकी दोन हजाराप्रमाणे एकूण आठ हजाराचा दंड आकारून तो वसूल करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल चोरमले, उपनिरीक्षक एच. एम. पठाण, एच.एस. पडिले, एस.आर. माने, शीतल शिंदाळकर, पी.के. काळे, उमाकांत माने, परमेश्वर सूर्यवंशी, कुदरत शेख, श्रीनिवास चिटूबोणे यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.

Web Title: Police route route from Nilanga on two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.